Share

‘दोन पिच्चरमध्ये मराठी सिनेमाला कुठल्या कुठं नेलंस तू भावा’, किरण मानेंनी केले तोंडभरून कौतुक

Jhund Movie

‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झुंड’ (Jhund Movie) हा चित्रपट आज सर्वत्र सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाबाबत सगळीकडून चांगली प्रतिक्रिया समोर येत आहे. यादरम्यान आपल्या लिखाणासाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते किरण माने यांनीही ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ‘झुंड’ हा चित्रपट देशभर धुमाकूळ घालणार असल्याचे म्हटले आहे.

किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचा एक पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरसोबत त्यांनी लिहिले की, ‘झुंड नादखुळा, भन्नाट, जबराटच असनार, देशभर धुमाकुळ घालनार यात वादच नाय. नागराज, आमच्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबतच हायेत’.

पुढे त्यांनी लिहिले की, ‘दोन पिच्चरमध्ये मराठी सिनेमाला कुठल्या कुठं नेलंस तू भावा! तुझा आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या गांवखेड्यातून हजारो नागराज उभे रहावेत… सर्वसामान्यांचं खरंखुरं जगनं-त्यांच्या वेदना-त्यांचा आनंद-त्यांच्या आशाआकांक्षा मोठ्या पडद्यावर याव्यात.. विकृत टोळींनी कब्जा केलेल्या मराठीतल्या दलदलीबाहेर निर्मळ मनाच्या प्रतिभावान कलाकारांची मराठी इंडस्ट्री उभी रहावी ही मनापासून इच्छा ! लब्यू नागराज’.

https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10224871067511550

किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत नागराज मंजुळे यांचे कौतुक करत आहेत. तसेत त्यांना ‘झुंड’ या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिलावहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे ते हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.

‘झुंड’ हा चित्रपट नागपूरमधील समाजसेवक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय बरसे हे एक निवृत्त क्रिडा शिक्षक होते. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग देऊन त्यांची एक टीम बनवली. तसेच त्यांनी स्लम सॉकर नावाच्या एनजीओचीही स्थापना करून समाजसेवा केली. आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात विजय बरसे यांची प्रेरणादायी कथा दाखवण्यात आली होती.

दरम्यान, ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे. अमिताभ यांच्यासोबत या चित्रपटात सैराट जोडी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत आहेत. संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
शाहरूखचा बहुचर्चित पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
त्याला मी रंगेहाथ पकडले होते तरी मी..; दीपिकाने सांगितला बॉयफ्रेंड रणबीरचा ‘तो’ किस्सा
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मधील ‘या’ दोन स्पर्धकांचे नशीब फळफळले, रोहित शेट्टीने दिली चित्रपटात काम करण्याची संधी

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now