गेल्या काही दिवसांपासून अभिनेते किरण माने हे सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे.
याच पार्श्वभूमीवर स्टार प्रवाहने मालिकेतून काढून टाकण्याचे दिलेले कारण हे माझ्या विरोधात केलेले षड्यंत्र आहे, असं किरण माने म्हणाले. याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘हे कारण म्हणजे दोन दिवसात ठरवून माझ्या विरोधात केलेले षड्यंत्र असल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. आपण चुकीचे वर्तन केले असते तर इतर महिला सहकलाकार आपल्यासाठी पुढे आल्या नसत्या, असे किरण माने म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आरोप करणाऱ्या एका महिला कलाकाराचे पती भाजपाचे पदाधिकारी असल्याचे सांगत यामागे राजकीय दहशतवाद असल्याचे माने यांनी दिल आहे. फिल्म इंडस्ट्रीत नेहमीच बहुजन कलाकारांवर अन्याय होत असून या विरोधात आपण लढणार असल्याचे किरण माने यांनी सांगितले आहे. आता माने यांच्या या आरोपांवर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, किरण माने यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर आणि शोच्या निर्मात्यांवर आरोप केला होता. किरण म्हणाले होते की, त्यांनी राजकीय भूमिका असलेली पोस्ट केली, त्यामुळे त्यांना अचानक मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी आज स्टार प्रवाह वाहिनीने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने यासंदर्भात परिपत्रक जारी करत म्हटले आहे की, ”किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषतः, महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला.
तसेच त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. माने यांना अनेक वेळा ताकीद देऊनही त्यांनी शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे त्यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे परिपत्रकात म्हंटले आहे.
पुढे स्टार प्रवाहने पुढे म्हटले आहे की, ”आम्ही सर्व मतांचा आणि मतांचा आदर करतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, आम्ही आमच्या कलाकारांसाठी विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या
१२ आमदारांचा पत्ता कट?; काँग्रेसमध्ये उडाली खळबळ, सोनिया गांधींच्या प्लॅनने सगळ्यांनाच बसला धक्का
लता मंगेशकर यांची तब्येत आणखी बिघडली, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती
मानेंना मोठं व्हायचय म्हणून वाद ते निर्माण करताहेत; शिवसेनेचे किरण मानेंवर गंभीर आरोप
कोहलीच्या राजीनाम्यानंतर जय शहांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया ; ३ वाक्यांत संपवला विषय