Share

Kiran Mane : ..तेव्हा मूग गिळून बच्चन गप्प बसला; वाढदिवसादिवशीच किरण मानेंनी बच्चनला धरले धारेवर

kiran mane amitabh bachchan

kiran mane post on amitabh bacchan  | प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने हे अनेकदा चर्चेच येत असतात. कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे किंवा फेसबूक पोस्टमुळे ते नेहमीच चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा किरण माने चर्चेत आले आहे. त्यांनी पुन्हा एक फेसबूक पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त किरण माने यांनी एक पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चनवर टीका केली आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर बच्चन काहीच बोलत नाही, अशा प्रकारची टीका किरण माने यांनी केली आहे.

किरण मानेंची फेसबूक पोस्ट-
“किरन्या माने सोत्ताला बच्चन समजतो.” ल्हानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हन्नार्‍यानं ते चिडून म्हन्लेलं असायचं, पन मनातल्या मनात मी लै खुश हुयाचो ! ल्हानपनी ‘बच्चन’ हे माझं ‘जग’ होतं… मायनीच्या ‘गरवारे टुरींग टाॅकीज’च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापास्नं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहानं हा आवडता छंद होता…

रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो… मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची श्टोरी सांगायची…बच्चनचं चालनं – बोलनं – बघनं – उभं रहानं – बसनं – पळनं – फायटिंग करनं सगळं-सगळं माझ्यात भिनलंवतं ल्हानपनी.

…त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढनारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेनारा ‘ॲंग्री यंग मॅन’ मनामेंदूत,रक्तात भिनला ! आता तरूनपनी मी काॅलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुनावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हनायला लागले, “हा काय स्वत:ला बच्चन समजतो की काय?”… ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं !

…पन खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या साताठ वर्षांत ! तोच ‘ॲंग्री यंग मॅन’ वैयक्तीक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाताना, मान खाली घालून-स्वाभिमान गुंडाळून ठेवून सत्ताधार्‍यांच्या वळचनीला बांधला गेलेला पाहून वैषम्य वाटायला लागलं… २०१४ पूर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीका करणारा बच्चन आज ११० रूपये झाल्यावर घाबरून ‘चुप्पी साधलेला’ पाहून आश्चर्य वाटलं… ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं त्या पंजाबी शेतकर्‍यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला बच्चन बघून कीव यायला लागली..

…पन लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या मानसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो ‘बच्चन’ आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला ‘बच्चन’ हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की…जिवंत – रसरशीत – खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!!
सलाम महानायक, कडकडीत सलाम… ❤
– किरण माने.

महत्वाच्या बातम्या-
Mashaal : नवं चिन्ह मिळताच मराठवाड्यात पेटली मशाल; शिवसेना उद्धव ठाकरे गटाची विजयी सलामी
Vasant more : समाज ईतका संवेदनाहीन का झालाय? आता नुसते जागे होऊन चालणार नाही…
Terrorists: दोन गोळ्या लागूनही इंडियन आर्मीच्या ‘या’ कुत्र्याने केला दहशतवाद्यांचा खात्मा, वाचा कोण आहे ZOOM?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now