अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे.
आता पुन्हा एकदा किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. ‘अपशब्द वापरत होता तर त्याला थोबाडला का नाही त्याचवेळी? पोलिस कम्प्लेन्ट का नाही केली? हे सांगायला पन्नास तास का लावले?,’ अशा आशयाची किरण माने यांची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यामुळे पुन्हा नव्याने या विषयाला वेगळे वळण लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख करत, त्यांनी एक उपरोधिक पोस्ट शेअर केली आहे. ‘किरण माने अपशब्द वापरत होता तर त्याला थोबाडला का नाही त्याचवेळी? पोलिस कम्प्लेन्ट का नाही केली? हे सांगायला पन्नास तास का लावले? छ्या! काही दमच नाही रे आरोपांमध्ये…,’ अशा आशयाची त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
दरम्यान, किरण माने यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर आणि शोच्या निर्मात्यांवर आरोप केला होता. किरण म्हणाले होते की, त्यांनी राजकीय भूमिका असलेली पोस्ट केली, त्यामुळे त्यांना अचानक मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर रविवारी आज स्टार प्रवाह वाहिनीने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने यासंदर्भात परिपत्रक जारी करत म्हटले आहे की, ”किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषतः, महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला.
तसेच त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. माने यांना अनेक वेळा ताकीद देऊनही त्यांनी शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे त्यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला,’ असे परिपत्रकात म्हंटले आहे.
पुढे स्टार प्रवाहने पुढे म्हटले आहे की, ”आम्ही सर्व मतांचा आणि मतांचा आदर करतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, आम्ही आमच्या कलाकारांसाठी विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत.”
https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10224630950908785
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्राने आधारवड गमावला, शेतकरी नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन
VIDEO: बोल्ड व्हिडिओमुळे नुसरत जहाँ झाली ट्रोल; लोक म्हणाले, खासदार आहे थोडी तरी लाज ठेव
नशीबच बदललं! एका वर्षात 2000% छप्परफाड रिटर्न; गुंतवणूकदारांना मिळाली आयुष्यभराची कमाई
मोठी बातमी! नितेश राणेंना अटक होणारच? जामीन फेटाळत हायकोर्टाने दिला मोठा निर्णय