Share

kiran agashe : दोन दिवसांवर साखरपूडा आला असताना बहिण-भावासोबत घडली दुर्देवी घटना, संपुर्ण गाव हादरले

kiran agashe

kiran agashe death in car accident  | कधी कोणती घटना घडेल हे सांगता येत नाही. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या अपघातांमध्ये काही लोकांना तर आपला जीवही गमवावा लागत आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सीआरपीएफ असलेल्या तरुणीचा भावासोबत जाताना अपघात झाला आहे. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. किरण सुखदेव आगाशे असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती भाऊ लोकेश आगाशेसोबत बाईकवर जात होती.

दोन दिवसांनी तिचा साखरपूडा होता. त्यामुळे बॅग खरेदी करण्यासाठी ती आपल्या भावाबरोबर गेली होती. अशातच ही धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही निलजचे रहिवासी होते. घरात काही दिवसांनी लग्न असताना तरुणीने जीव गमावल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

किरण ही मुंबईच्या सीआरपीएफमध्ये नोकरीला होती. दोन दिवसांनी तिचा साखरपूडा होता. त्यामुळे ती आपल्या भावासोबत बॅग खरेदी करण्यासाठी तुमसरला गेली होती. बॅग खरेदी करुन ते जेव्हा परतत होता तेव्हा हा भयानक अपघात झाला आहे.

देव्हाडी उड्डाणपूलावरुन जाताना एका दुचाकीने त्यांच्या गाडीला कट मारला. त्यामुळे त्यांची नियंत्रण बिघडले आणि ते दोघेही खाली पडले. अशात मागून येणाऱ्या ट्रकखाली किरणचे डोके आले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात लोकेश जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

या घटनेने लग्नाच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. किरण ही सीआरपीएफमध्ये कामाला होती. दोन दिवसांनी तिचा साखरपूडा होता. त्यामुळे ती गावाला आली होती. काही सामान खरेदी करण्यासाठी ती आपल्या भावासोबत गेली होती. अशातच हा अपघात झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
एक-एक रुपयासाठी तरसत होता चिमुकला, एका रात्रीत झाला २ कोटींचा मालक; वाचा नक्की काय घडलं
‘ही’ कंपनी टाटा, महिंद्राच्याही पुढे! बनवली १३ सीटर कार, किंमत आहे फक्त…
पोलिस म्हणाले ‘तुमच्या हाॅटेलचा रस्सा चांगला नाही’; भडकलेल्या मालकाने दांडक्याने चोपले

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now