Share

Driver: स्वतः मृत्यू पत्करला पण वाचवले २५ प्रवाशांचे प्राण; एसटी चालकाची डोळ्यांत पाणी आणणारी स्टोरी

pawar and bus

ड्रायव्हर(Driver): स्वतःचा जीव पणाला लावून एसटी ड्रायव्हरने २५ प्रवाशांचा जीव वाचवला. पुणे – सातारा हायवेवर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा हायवेवर एसटी बस धावत होती. चालकाला अचानक चक्कर येऊ लागले व हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही अत्यंत हृदयद्रावक घटना असल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

चालकाला बरं वाटत नाही, हे त्याच्या लक्षात आल्यावर काही विपरीत घडू नये. म्हणून त्याने बसला गती असतानाही कशीबशी बस बाजूला घेतली. चालकाने इतक्या मोठ्या संकटातदेखील प्रसंगावधान राखलं. बस थांबवल्यानंतर काही वेळातच चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी चालकाने केलेल्या कर्तव्याचे, उदारतेचे कौतुक केले जात आहे.

२५ प्रवाशांचा जीव वाचवून स्वतःचा जीव मात्र चालकाने गमावला. खेड शिवापूरचा टोलनाका पार केल्यानंतर बसचा वेग मंदावला. त्यामुळे वाहकाने चालकाला विचारपूस केली, तेव्हा चक्कर येत असल्याचं सांगत चालकाने बस रस्त्याच्या कडेला लावली. वाहकाने चालकाला पुन्हा आवाज दिला, मात्र चालकाने प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर वाहकाने प्रवाशांची मदत घेऊन त्याला नसरापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. बस चालकाच्या जाण्याने सहकारी एसटी कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. चालकाचे नाव जालिंदर पवार असून वय ४५ वर्ष होते. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली.

राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जात होती. पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर चालक जालिंदर पवार यांना चक्कर आली. यानंतर प्रसंगावधान राखून चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचे जीव वाचले.

मृत ड्रायव्हर पुण्यात बदली ड्रायव्हर म्हणून आलेले होते. याप्रकरणी बसचे वाहक संतोष गवळी यांनी नसरापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात माहिती दिली. बुधवारी वसईवरून आलेली एस बस दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात पोहचली. यावेळी बस चालक संतोष कांबळे यांना बदली चालक म्हणून जालिंदर पवार आले.

महत्वाच्या बातम्या
Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीर सिंह पुन्हा एकदा होणार न्युड; ‘या’ प्रसिद्ध संस्थेने केली जाहीर विनंती
Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडत थेट मर्मावरच बोटं ठेवलं; मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावर…
Shivsena: शिवसेनेची ‘ती’ मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळत दिला मोठा धक्का, शिंदे गटाचा मार्ग झाला सोपा
Pune: पुण्यातीस एसटी चालकाने स्वतः मृत्यूला कवटाळले पण गाडीतील २५ प्रवाशांचे प्राण वाचवले

ताज्या बातम्या आरोग्य इतर राज्य

Join WhatsApp

Join Now