Share

प्रसिद्ध क्रिकेटपटू कायरन पोलार्डचा धक्कादायक निर्णय; क्रिकेटमधून घेतला कायमचा संन्यास

क्रिकेट विश्वात सध्या अनेक गोष्टी घडत आहेत. सध्या अशी एक घटना घडली आहे. ती वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डबद्दल आहे. किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या अचानक घोषणेनंतर क्रिकेट विश्वात सर्वांनाच आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. (kieron pollard annonce retirement)

पोलार्ड हा जगातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तो त्याच्या घातक गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पोलार्डने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले आहेत. त्याने ३४ वर्षात निवृत्ती घेतली आहे. सध्या पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत आहे.

तसेच पोलार्ड मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे नेतृत्व करत होता. पोलार्ड हा वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. ज्याने दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकला होता. पोलार्डकडे काही चेंडूंमध्ये सामना बदलून टाकण्यासाठी ताकद आहे. पोलार्डमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता आहे. त्याने आयपीएलमध्ये देखील आपली जादू दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘मुख्यमंत्र्याला आळशीपणा परवडणारा नाही,’ मुख्यमंत्र्यांनी स्वत: बद्दलच केली टीप्पणी, वाचा का म्हणाले असं?
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
VIDEO: हार घालताच नवरीने नवरदेवाच्या दिल्या दणादण कानाखाली, तरीही शांतीत पार पडला लग्नसमारंभ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now