coffee With Karan: कॉफी विथ करण‘ हा संवाद कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम प्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला आहे. कार्यक्रमाचे ६ सिझन पूर्ण झाले आहेत. सध्या या कार्यक्रमाचे ७ वे सिझन सुरु आहे. करण जोहर या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वांना आमंत्रित करतो आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करतो. हा शो 2004 मध्ये सुरु झाला आणि खूप यशस्वी झाला.
शोचा पहिला भाग 19 नोव्हेंबर 2004 रोजी प्रसारित झाला आणि त्याचा पहिला सीझन 27 मे 2005 रोजी संपला. काहीकाळ शो थांबवण्यात आला. चार वर्षांनंतर पुन्हा 7 नोव्हेंबर 2010 रोजी हा कार्यक्रम टीव्हीवर परतला. या नव्या सिझनचा सहावा एपिसोड गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला.
कॉफी विथ करण हा शो सध्या खूपच चर्चेत आहे. प्रत्येक एपिसोड रिलीज होताच त्यातून अनेकांच्या बाबतीत मोठे खुलासे होतात. या शोमध्ये अनेकांच्या लव्हस्टोरी, डेटिंग, लग्न याबाबतचे खुलासे होतात. यावेळी कॉफी विथ करण या शोमध्ये कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर आले होते. ते आल्यांनतर अनेक विषयांवर चर्चा झाल्या, अनेक खुलासे झाले. या दोघांमधील एक महत्वाचा खुलासा कियाराने केला आहे.
कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर यांचा कबीर सिंग हा सिनेमा फार गाजला होता. कबीर सिंगच्या शूटिंगदरम्यान शाहिद कपूरच्या थोबाडीत द्यावी असं मला वाटलं होतं, असा खुलासा कियारा अडवाणीने केला आहे. नेमकं काय घडलं की, कियाराला शाहिदच्या थोबाडीत द्यावी असं वाटलं? कबीर सिंग हा सिनेमा आक्रमकच होता पण तसं काही घडलं नाही. वेगळीच घटना घडली होती.
कियाराने सांगितले की, “शुटिंगचा माझा तिसरा किंवा चौथा दिवस होता आणि मला सेटवर शाहिदची आठ तास वाट बघायला सांगण्यात आले. कारण शाहिद पुढचा सीन करणार व त्यात कोणते शूज वापरणार यावर चर्चा चालू होती. कियाराने सांगितलेला हा किस्सा ऐकून करण जोहरही हैराण झाला होता. त्यामुळेच कदाचित करणनेही कियाराची बाजू घेतली.
करणने ताबडतोब कियाराला पाठिंबा दिला आणि म्हणाला. “जर मला शूजवर चर्चा करण्यासाठी 8 तास थांबायला सांगितले असते, तर मी सुद्धा थोबाडीत दिली असती.” यावर शाहिद काहीही बोलला नाही, त्याने हसून वेळ काढली.
महत्वाच्या बातम्या
Sonali Phogat: सोनाली फोगट यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, शरीरावर जबरदस्तीने…
BJP : मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपचा वॉच; कार्यालयात कायम असणार फडणवीसांचा ‘हा’ खास माणूस
VIDEO: राजू श्रीवास्तवला १५ दिवसांनी जाग आल्यानंतर मित्र सुनील पाल ढसाढसा रडला, म्हणाला…
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी कंत्राटी मुख्यमंत्री हिणवताच एकनाथ शिंदे कडाडले, म्हणाले, बाळासाहेबांचे…