Share

Foxconn project : ‘खोकेवाल्यांना महाराष्ट्रातील तरूणांचे काही पडले नाही, बाप ना भैय्या सबसे बडा रूपय्या’

सध्या फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यातील राजकारण पेटलं आहे. पुण्यातील तळेगाव या ठिकाणी होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. हा प्रकल्प गेल्यामुळे राज्यातल्या बेरोजगार तरुणांना मिळणारा रोजगारही गुजरातमध्ये गेला आहे, त्यामुळे मराठी तरुण देखील आता सरकारवर भडकले आहेत.

तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे. तरुणांनी याविरोधात आता सरकारला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियाद्वारे राज्यातील तरुण राज्यसरकारवर टीका करत आहे.

कोणी लिहिले, आता गप्प बसायचे, खोके वाल्यांना महाराष्ट्रांतील तरूण तरूणींचे पडलेलं नाही, निवडणूकीच्या वेळी, किंवा दहीहंडी, गणेश विसर्जन, गरबा वेळी त्यांच्यावर खोक्यातील चार पैसे उधळले जातील, तरूण तरूणी पण मजेत, कल का देखा जायेगा? असे म्हंटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना काहींनी लिहिले, राजकारणाच्या पलीकडं हा हा हा ५० खोके, ईडीची भीती आता जे सगळं चालू आहे ते फक्त याच साठी आहे. विश्वास कोणावर ठेवावा हेच समजत नाही. निदान तुम्ही तरी धीट असाल असं वाटत होतं, पण समज खोटा ठरला, बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया..

https://twitter.com/Tatya_Speaks/status/1569656472224800773?t=p8n3oNyjE3oeYQkd_71nYw&s=19

काहींनी म्हंटलं,पळवापळवी गद्दार सरकार? अगोदर महाराष्ट्राचे आमदार गुजरातला पळवले. आता महाराष्ट्राच्या हक्काचा फॉक्सकाँन प्रकल्प गुजरातला पळवला. आता १ लाख २० कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जातो म्हणून राज्यातल्या युवकांनी हाताश व्हायचं कारणच नाही, उलट डीजे लावून नाचायचं, असे उपरोधिक बोलले आहे.

https://twitter.com/bavkarviraj/status/1569648142836183043?t=N3ON1WIJrPYbUuovDSn33A&s=19

फॉक्सकॉन कंपनी बाबत माहिती म्हणजे, फॉक्सकॉन या कंपनीचे नाव सेमीकंडक्टर निर्मितीच्या जागात अग्रक्रमाने घेतले जाते. फॉक्सकॉनने वेंदात कंपनीसह भारतात काही प्रकल्पांसाठी करार केलेले आहेत. या दोन कंपन्या एकत्रितपणे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करत आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now