Politics: परभणीच्या (parbhani) राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या(Shinde Group) शिवसेनेने नुकताच परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी व काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता पक्षांतर्गत विरोधाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस तथा वाशीम जिल्हा निरीक्षक डाॅ संजय रोडगे (Dr. Sanjay Rodge)भाजपच्या वाटेवर आहेत.
डॉ. संजय रोडगे म्हणाले, पक्षात कुठल्याही प्रकारे पदाची अपेक्षा न ठेवता गेली १५ वर्षांपासून पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी पार पाडली. त्यासाठी दिवस रात्र कष्ट केले. रवळगाव ग्रामपंचायत एक हाती सत्ता, डॉक्टर संजय दादा रोकडे मित्र मंडळाच्या माध्यमातून खोडेपाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला. तसेच, खेड्यापाड्यात स्वखर्चाने विकास कामे केली.
पण, पक्षांतर्गत विरोध, पक्षांच्या कार्यक्रमाला डावलणे अशा प्रकारचे राजकारण जिव्हारी लागल्यामुळे अखेर पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजय रोडगे यांनी भाजपाची वाट धरली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याची चांगलीच किंमत मोजावी लागणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, संजय रोडगे यांनी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश होणार असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे. तसेच, डॉ संजय रोडगे यांनी आपल्या काही समर्थकांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. ही भेट ३१ मार्चला घेण्यात आली. त्यानंतर लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सेलू येथे सांगितले.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हापासून डॉक्टर संजय रोडगे हे पवारांसोबत काम करत होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी आमदार विजय यांनी डॉ. संजय रोगडे यांचा विचार न घेता राष्ट्रवादीचा पॅनल उभा केला होता. त्यावेळी रोकडे यांनी स्वतः च्या जोरावर ही निवडणूक जिंकली. या प्रकरणानंतर विजय भांबळे आणि डॉ. संजय रोडगे यांच्या सातत्याने वाद सुरू झाले.
भानसाळे यांच्यावर गंभीर आरोप करत डॉक्टर संजय रोडगे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. या पक्ष प्रवेशामुळे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे राजकारण बदलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच, माझी विनाकारण पक्षात घुसमट करण्यात येत असल्याने मी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि मेघना बोर्डीकर सोबत राहून काम करणार असल्याचे रोडगे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –






