दाक्षिणात्य अभिनेता यश सध्या त्याच्या आगामी ‘केजीएफ २’ (KGF 2) या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान त्याची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आहे. चित्रपटात रॉकी भाईची डॅशिंग भूमिका साकारणारा यश खऱ्या आयुष्यात महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानतो. स्वतः एका मुलाखतीत बोलताना यशने याबाबत खुलासा केला होता.
यशला GQ India ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तुझ्या आयुष्यात तुझा आदर्श किंवा तुला प्रेरित करणारी व्यक्ती कोण आहे? या प्रश्नावर उत्तर देताना यशने सांगितले होते की, तो प्रत्येकाकडून चांगल्या गोष्टी घेत असतो. तसेच त्याला महेंद्रसिंग धोनीचा अॅटिट्यूड खूप आवडतो. धोनीमुळे त्याला प्रेरणा मिळत असून धोनीला तो त्याचा स्फूर्तिस्थान मानतो.
यशने म्हटले होते की, ‘महेंद्रसिंग धोनीचा अॅटिट्यूड मला खूप आवडतो. त्याचा धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, वैचारिक क्षमता त्याचं एकंदरित व्यक्तिमत्व मला खूप आवडतं. मी त्याच्याशी अनेकप्रकारे रिलेट करू शकतो. त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळते’. यासोबतच यशने कन्नड अभिनेते-निर्माते शंकर नाग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपला स्फूर्तिस्थान मानतो, असे यावेळी सांगितले होते.
दरम्यान २०१८ साली आलेल्या ‘केजीएफ’ हा चित्रपट बिग हिट ठरला होता. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रशांत नील यांनी प्रेक्षकांसाठी दुसरा भाग घेऊन आले. १४ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. मूळ कन्नड भाषेत असणारा हा चित्रपट तेलूगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
‘केजीएफ २’ मध्ये यशसोबत अभिनेता संजय दत्त, प्रकाश राज तसेच अभिनेत्री रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहेत. नुकतीच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. तर ट्रेलर प्रदर्शित होताच त्याला २४ तासाच्या आत १०९ मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. त्यानुसार हा ट्रेलर आतापर्यंत सर्वात जास्तवेळा पाहण्यात आलेला भारतीय ट्रेलर बनत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला.
महत्त्वाच्या बातम्या :
द काश्मिर फाईल्सची टीम पुन्हा एकत्र, विवेक अग्निहोत्री दोन चित्रपटांतून बाहेर आणणार काळे सत्य
रणबीर कपूरच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या ‘या’ टॉपच्या अभिनेत्र्या, पण प्रेमात मिळाला धोका
रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली? भट्ट कुटुंबीयांनी वाढवलं कन्फ्यूजन