‘केजीएफ’ (KGF) फेम अभिनेता यश (Yash) सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. त्याने अभिनय केलेल्या ‘केजीएफ’ आणि ‘केजीएफ २’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली. या चित्रपटांमुळे यशला खूप लोकप्रियता मिळाली असून तो पॅन इंडिया स्टार झाला आहे. यादरम्यान यशला एका कोट्यवधी रूपयांच्या जाहिरातीची ऑफर मिळाली. पण त्याने हे ऑफर नाकारले आहे.
नुकतीच काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की, ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जूनने पान मसाला जाहिरात करण्यास नकार दिला आहे. ‘माझ्या चाहत्यांना वाईट व्यसन लागावे, अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे मी ही जाहिरात करणार नाही’, असे अल्लू अर्जूनने म्हटल्याचे सांगण्यात आले. ही बातमी समोर येताच ती सर्वत्र वेगाने पसरली.
त्यानंतर अल्लू अर्जूनच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. पण दुसरीकडे यावरून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले. कारण अक्षय कुमारने यापूर्वी तंबाखूची जाहिरात केली होती. परंतु, सोशल मीडियावर होणारा ट्रोलिंग पाहता अक्षयने चाहत्यांची माफी मागितली. अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची जाहिर माफी मागितली होती. तसेच तो या जाहिरातीतून माघार घेत या जाहिरातीच्या माध्यमातून मिळालेला पैसा चांगल्या कामासाठी खर्च करणार असल्याचे सांगितले होते.
यादरम्यान आता ‘केजीएफ’ फेम अभिनेता यशने पानमसाला आणि इलायची ब्रांडच्या कोट्यवधीं रूपयांच्या जाहिरातीची ऑफर नाकारल्याची बातमी समोर येत आहे. यावरून अनेकजण असे म्हणत आहेत की, अक्षय कुमारला झालेला ट्रोलिंग पाहता यशने हा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे यशसाठी एंडोर्समेंट डील्स सांभाळणाऱ्या Exceed Entertainment एजेन्सीद्वारे यासंदर्भात एक प्रेसनोट जारी करण्यात आले.
यामध्ये एक्सीड एंटरटेनमेंटचे टॅलेंट आणि न्यू वेंचर्स हेड अर्जुन बनर्जी यांनी सांगितले की, ‘पान मसाला आणि यासारखे पदार्थ लोकांच्या आरोग्यासाठी फारच हानिकारक आहेत. अशा पदार्थांमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अशा पदार्थांच्या सेवनाने लोकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे यशने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे’.
‘तसेच यापुढेही आम्ही कोणाशी संबंधित डील करत आहोत याबाबतही पूर्ण सावधगिरी बाळगणार आहोत. देशभरात असलेली यशची लोकप्रियता पाहता त्याचे चाहते आणि फॉलोअर्स यांच्यापर्यंत योग्य संदेश पोहोचवता येईल, अशाच ब्रँडमध्ये आम्ही गुंतवणूक करू इच्छित आहोत’.
महत्त्वाच्या बातम्या :
डिप्रेशननंतर आता ‘या’ गंभीर आजाराचा सामना करत आहे आमिर खानची मुलगी; चाहते चिंतेत
..त्यामुळे मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करावे अशी त्याची इच्छा होती, जॅकलीनने ईडीसमोर दिली कबूली
सेक्स हे कॅलरीज बर्न करण्यासाठी..; आयुष्मान खुरानाच्या पत्नीने सेक्स लाईफबद्दल केला मोठा खुलासा