रॉकिंग स्टार यश ‘केजीएफ २’ (KGF 2) मधील आपल्या अभिनयाने सर्वांचेच मन जिंकून घेत आहे. हिंदी व्हर्जनमधील त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. यादरम्यान यशचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये यश हिंदीत बोलताना दिसून येत आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहते खूप पसंती देत आहेत.
दाक्षिणात्य कलाकार सध्या हिंदी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहेत. ‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जूनसाठी जशी क्रेझ पाहायला मिळाली होती तसेच प्रेम आता यशला प्रेक्षकांकडून मिळत आहे. यशचा मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या युट्यूबवर खूपवेळा पाहिला जात आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसत आहे की, यश ‘केजीएफ २’ (KGF 2) च्या प्रमोशनसाठी त्याच्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने हिंदीत उत्तर देऊन सर्वांचेच मने जिंकली आहेत. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत त्याच्या स्टाईलचे त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. तसेच अनेकजण हिंदीत डबिंग त्यानेच करायला पाहिजे होतं, असे कमेंटद्वारे सांगत आहेत.
व्हिडिओत दिसत आहे की, यशला मुलाखतीदरम्यान विचारण्यात येते की, तुम्ही यापूर्वीही अॅक्शन चित्रपट केला आहात. पण केजीएफ २ (KGF 2) हा चित्रपट थोडासा अवघड आहे. तर या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी यश माईक घेतो आणि सुरुवातीला म्हणतो की, ‘सबको नमस्ते’. त्यानंतर तो हिंदीतच या प्रश्नाचे उत्तर देतो.
यश सांगतो की, ‘पहिली गोष्ट म्हणजे आम्ही मारहाण असणाऱ्या चित्रपटांबाबत विचार करत नाही. पण त्यामागे एक भावना असेल तर सर्वांनाच वाटतं की, चित्रपटात असं अॅक्शन असावं. त्यामुळे हे एका युद्धाप्रमाणे आहे जिथे मारहाण सर्वकाही मागे पडते आणि केवळ उद्दिष्ट समोर दिसते. हे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक युद्धसुद्धा आहे. जिथे अभिनेता आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी समोर येणाऱ्या प्रत्येक समस्यांना सामोरे जातो आणि त्याच्याशी भिडतो.
यावेळी यश त्याच्या चित्रपटांच्या निवडीबाबत सांगताना म्हणतो की, ‘मी नेहमी असे चित्रपट करतो जे संपूर्ण कुटुंबासोबत बसून पाहता येतील. प्रेक्षकांनी शिट्ट्या मारत, टाळ्या वाजवत, नाचत चित्रपट पाहावा, असा आमचा उद्देश असतो. कारण जेव्हा चित्रपट पाहून प्रेक्षक आनंदित होतील तेव्हाच तुम्हाला तुमच्या कामाचा योग्य मोबदला मिळत असतो’.
यावेळी ‘केजीएफ २’ (KGF 2) संजय दत्तसोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत विचारण्यात आले असता यशने म्हटले की, ‘त्यांच्याबरोबर काम करून मला खूप आनंद झाला. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. आम्ही अनेक कठिण परिस्थितीतही या चित्रपटाचे चित्रीकरण केलं. अशात संजय दत्त यांनी ज्याप्रमाणे त्यांचं डेडिकेशन दाखवलं, ते सर्वांसाठी शिकण्यासारखी गोष्ट आहे’.
महत्त्वाच्या बातम्या :
काही महिन्यांपासून मला पीरियड्स आले नसल्यामुळे.., मित्रांनी धोका दिल्यानंतर रडली पूनम पांडे
जेव्हा मुलींनी राजेश खन्नाचे फाडले होते कपडे, ‘या’ कारणामुळे मुली झाल्या होत्या आउट ऑफ कंट्रोल
४५ वर्षांच्या वयातही हॉट दिसते ‘आओ राजा’ गाण्यातील चित्रांगदा, सुंदर दिसण्यासाठी पिते ‘हे’ खास ड्रिंक