Share

चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ‘KGF 2’ च्या ट्रेलरने बनवला मोठा रेकॉर्ड, २४ तासात मिळाले ‘एवढे’ व्ह्यूज

KGF 2

दाक्षिणात्य अभिनेता यश अभिनित ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशचे चाहते आतुरतेने या चित्रपटासाठी वाट पाहत आहेत. यादरम्यान प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवत नुकतीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. तर ट्रेलर पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यादरम्यान प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने एक रेकॉर्ड बनवला आहे.

‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF 2) या चित्रपटाचा ट्रेलर २७ मार्च रोजी रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये अभिनेता यश आपल्या जुन्या अंदाजात दिसून येत आहे. तर संजय दत्तचे अधीरा भूमिकेतील जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. त्याच्या या भूमिकेने संजय दत्तने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय या चित्रपटात रवीना टंडन आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत आहेत. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ट्रेलर प्रदर्शित होताच त्याला २४ तासाच्या आत १०९ मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आजपर्यंत कोणत्याही ट्रेलरला एवढे व्ह्यूज मिळाले नाहीत. त्यामुळे हा ट्रेलर आतापर्यंत सर्वात जास्तवेळा पाहण्यात आलेला भारतीय ट्रेलर बनत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी यासंदर्भात एक ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

‘केजीएफ 2’ (KGF 2) चित्रपटाची निर्मिती करणारी कंपनी होमेबल फिल्म्सद्वारे ट्विट करत लिहिण्यात आले की, ‘रिकॉर्ड्स.. रिकॉर्ड्स.. रिकॉर्ड्स..रॉकीला हे आवडत नाही. तो याकडे दुर्लक्ष करतो. पण तो रॉकीप्रमाणे रेकॉर्ड्स करतो. यास तो दुर्लक्ष करू शकत नाही. २४ तासात १०९+ मिलियन व्ह्यूज’.

‘केजीएफ’ (KGF 2) हा चित्रपट कन्नडसोबत, तेलूगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला कन्नडमध्ये १८ मिलियन व्ह्यूज, तेलुगूमध्ये २० मिलियन व्ह्यूज, तमिळमध्ये १२ मिलियन व्ह्यूज, मल्याळमध्ये ८ मिलियन व्ह्यूज आणि हिंदीमध्ये सर्वात जास्त ५१ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, ‘केजीएफ २’ (KGF 2) या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. तर आता चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास यशस्वी ठरेल का? ये लवकरच कळणार आहे. तर १४ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
हिट चित्रपट बनवण्याची मशीन आहे एस एस राजामौली, २१ वर्षात दिलेत २१ सुपरहिट चित्रपट
सायकल स्वाराने जिंकले आनंद महिंद्राचे मन, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, मला वाईट वाटते की…
लक्झरी कार सोडून मुंबई लोकलने प्रवास करत होता ‘हा’ अभिनेता, साधेपणाचे लोकांनी केले कौतुक

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now