रॉकिंग स्टार यशचा केजीएफ २ (KGF 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील रॉकीभाईचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच चित्रपटातील रॉकीभाईचा ‘Violence.. ‘ हा डायलॉगही सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यादरम्यान आता एका चाहत्यावर या डायलॉगचा फिव्हर इतका चढला आहे की, त्याने चक्क त्याच्या लग्नाच्या पत्रिकेत हा डॉयलॉग रिक्रिएट केला आहे. ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘केजीएफ २’ (KGF 2) चित्रपटात यश म्हणजे रॉकीभाई जेव्हा अधीरासमोर उभा राहतो तेव्हा तो गोळ्या झाडतो आणि एक डायलॉग म्हणतो. हा डायलॉग असा की, ‘Violence, Violence, Violence… I Don’t Like It! But.. Violence Likes Me, I Can’t Avoid!’. रॉकीभाईचा हा डायलॉग सध्या चर्चेत असून सर्वांनाच तो तोंडपाठ झाला आहे.
यादरम्यान रॉकीभाईच्या एका चाहत्याने त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत हा डायलॉग रिक्रिएट केला आहे. या लग्नपत्रिकेत वर आणि वधूचे नाव दिलेले आहे. चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीची ही पत्रिका असून तो कर्नाटकमधील बेलगाव येथे श्वेता नावाच्या मुलीसोबत लग्न करणार आहे. या लग्नपत्रिकेवर ‘केजीएफ २’ (KGF 2) मधील डायलॉगप्रमाणे जे कॅप्शन दिलेले आहे ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
लग्नपत्रिकेवर लिहिलेले आहे की, ‘लग्न, लग्न, लग्न. ते मला आवडत नाही. मी ते टाळतो. पण माझ्या नातेवाईकांना लग्न आवडतं. मी ते टाळू शकत नाही’. सध्या सोशल मीडियावर ही लग्नपत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु, ही लग्नपत्रिका खरी आहे की नाही, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.
दरम्यान, ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने देशभरात १३४.५ कोटींची कमाई केली आहे. तर केवळ ४ दिवसात या चित्रपटाने ५०० कोटींचा आकडा पार केला आहे. येत्या काळात हा चित्रपट आणखी जुने रेकॉर्ड तोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘केजीएफ २’ (KGF 2) मध्ये यशसोबत संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज यासारखे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून २०१८ साली आलेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. पहिल्या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. तर आता केजीएफचा दुसरा भागही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
विजू खोटे यांची भाची आहे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून विश्वास बसणार नाही
रोहित-जुईलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले, ‘बाळाला अंघोळ तरी घालायची तुझ्या’
प्रसिद्ध भोजपुरी गायिकेचा MMS झाला लीक, गायिकेने लोकांना शेअर न करण्याचे केले आवाहन