सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची खूप चलती आहे. ‘बाहुबली’, ‘पुष्पा’ नंतर आता ‘आरआरआर’ चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. तर आता लवकरच ‘केजीएफ २’ (KGF 2) हा आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. चाहते या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ‘दक्षिणेत आमचे चित्रपट का चालत नाहीत?’असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आता ‘केजीएफ २’ फेम अभिनेता यशने उत्तर दिले आहे.
सलमान खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाचे अभिनंदन केले होते. तसेच त्यावेळी ‘आमचे चित्रपट दक्षिणेत का चालत नाहीत?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. तर सलमानचा हा प्रश्न यशला त्याच्या नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना यशने असे काहीही नसून कधीकधी आमच्याही चित्रपटांना यश मिळत नाही, असे म्हटले आहे.
यशने म्हटले की, ‘सलमान खान म्हणतात तसं अजिबात नाहिये. आमच्या चित्रपटांनाही याआधी असा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण आता डब व्हर्जन बनवायला सुरुवात झाली आहे. लोकांना आता आमच्याद्वारे तयार करण्यात येत असलेले चित्रपट माहित आहेत. सुरुवातीला लोक डबिंगकडे गंतम म्हणून पाहत असे. परंतु, आता ज्या प्रकारचे डबिंग होत आहे, ते लोकांना आवडत आहे. पण हे एका रात्रीत घडले नाही’.
यशने पुढे म्हटले की, ‘सुरुवातीची काही वर्ष अशीच होती. नंतर हळूहळू लोकांना कंटेट, एक्सप्रेशन असे सर्वकाही समजू लागले. एसएस राजमौली सर आणि बाहुबलीशी थेट कनेक्ट होण्याचा मार्ग आम्हाला सापडला. यानंतर केजीएफला व्यावसायिक अँगल दिला. केजीएफ चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला वाटलं की, हा चित्रपट संपूर्ण भारतात धमाका करू शकतो. त्यात आमचे निर्मातेही सामिल झाले. त्यानंतर आम्ही खूप मेहनत केली आणि आम्हाला यश मिळालं’.
हिंदी चित्रपटांबाबत बोलताना यशने म्हटले की, ‘आपल्या भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद आहेत. परंतु, त्यांना आपला कमकुवतपणा बनवण्यापेक्षा आपली ताकद बनवले पाहिजे. तसेच मी अनेक हिंदी चित्रपट पाहिले असून ते चित्रपट मला आवडतात’, असेही यशने यावेळी म्हटले आहे. यशच्या मते चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी चांगले स्क्रिप्ट. चांगले प्रोडक्शन हाऊस अशा अनेक पैलूंवरही लक्ष द्यायला पाहिजे.
दरम्यान, ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट कन्नडसोबत, तेलूगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेता यश आपल्या जुन्या रॉकी भाईच्या अंदाजात दिसून येणार आहे. तर यशसोबत यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राज यांच्याही मुख्य भूमिका आहेत. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून १४ एप्रिल २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली? भट्ट कुटुंबीयांनी वाढवलं कन्फ्यूजन
मी असे पुरस्कार घेत नाही पण, ‘हा’ माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार; मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं
‘भाभीजी घर पर हैं’ मध्ये 300 हून अधिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आसिफने केला वर्ल्ड रेकॉर्ड, वाचून अवाक व्हाल