Share

‘या’ कारणामुळे दाक्षिणात्य चित्रपटांसमोर बॉलिवूड चित्रपट टिकत नाहीत; संजय दत्तने सांगितले कारण

KGF 2 Sanjay Dutt

प्रशांत नीलद्वारा दिग्दर्शित ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर ‘पुष्पा’, ‘आरआरआर’नंतर आता ‘केजीएफ २’ च्या यशाद्वारे पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेसृष्टी बॉलिवूडवर भारी पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

यामुळे आता बॉलिवूड चित्रपटांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी कमाई करण्यास का कमी पडत आहेत, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. यादरम्यान नुकतीच एका मुलाखतीत बोलताना संजय दत्तने या प्रश्नावर उत्तर दिले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना संजय दत्तला विचारण्यात आले होते की, टसध्या बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे यश संपादन करत आहेत, यामागे काय कारण असेल, असे तुम्हाला वाटते?’ या प्रश्नाचे उत्तर देताना संजय दत्तने म्हटले की, ‘मला वाटतं की, बॉलिवूडने हिरोगिरी विसरली आहे. पण दाक्षिणात्य सिनेसृष्टीने नाही. दाक्षिणात्य चित्रपटात हिरोला महत्त्व देतात. पण बॉलिवूडमध्ये या गोष्टीचा विसर पडत चालला आहे’.

‘आपले अधिकतर प्रेक्षक हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि राजस्थानमधील आहेत, हे बॉलिवूडने विसरले आहे. आणि मी आशा करतो की, हिंदी सिनेसृष्टीत हा ट्रेंड पुन्हा यावा. सुरुवातीला आपल्याजवळ वेगवेगळे निर्माते होते आणि फायनान्सर होते. पण त्यांना फिल्म स्टुडियोच्या कॉर्पोरायजेशने नष्ट करून टाकले. कार्पोरेट चांगला आहे पण त्यामुळे चित्रपटांच्या प्रयोगात व्यत्यय आला नाही पाहिजे’.

संजय दत्तने पुढे म्हटले की, ‘राजमौलींजवळ एक फिक्स निर्माता आहे आणि त्यांना राजमौली यांच्या ध्येयावर पूर्ण विश्वास आहे. तसेच आपल्याजवळही सुरुवातीला असे अनेक निर्माते होते. यामध्ये गुलशन राय, यश चोप्रा, सुभाष राय आणि यश जौहर यासारख्या निर्मात्यांचा समावेश होता आणि त्यांनी बनवलेले चित्रपट पाहा’.

‘पूर्वीचे निर्माते फक्त गुंतवणूक करायचे आणि दिग्दर्शकाच्या नजरेतून चित्रपट पाहायचे. परंतु, आता बॉलिवूडमध्ये अशा निर्मात्यांना स्टुडिओच्या कार्पोरायजेशनने नष्ट करून टाकले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांना यशासाठी झगडावं लागतं. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्क्रिप्टच्या कागदावर चित्रपट पाहिला जातो. तर बॉलिवूडमध्ये स्क्रिप्टच्या कागदावरच कमाईची आकडेमोड केली जाते. यामुळेच दाक्षिणात्य चित्रपट हिंदी चित्रपटांवर भारी पडतात’, असे संजय दत्तने यावेळी म्हटले.

दरम्यान, संजय दत्तने ‘केजीएफ २’ या चित्रपटात गरूडाचा भाऊ अधीरा ही भूमिका साकारली आहे. आपली ही नकारात्मक भूमिका संजय दत्तने पडद्यावर उत्तमपणे साकारली असून त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. संजय दत्तसोबत या चित्रपटात रवीना टंडन, प्रकाश राज, राव रमेश, मालविका अविनाश, श्रीनिधी शेट्टी यासारखे कलाकारसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
आता सिनेमागृहातही वाजणार ‘भोंगा’; मनसेने मोठी घोषणा करत तारीखही सांगीतली
अनुपम खेरच्या सावत्र मुलासोबत सोहेलचे झाले होते कडाक्याचे भांडण, झाली होती मारामारी, वाचा किस्सा
विजू खोटे यांची भाची आहे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

बाॅलीवुड ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now