KGF 2 च्या वादळाने सगळे चित्रपट झोपवले, चार दिवसात एवढ्या कोटींचा आकडा पार, RRR चा रेकॉर्ड मोडणार?

KGF: Chapter 2′ ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची असलेली क्रेझ आणि त्याचा व्यवसायाचा वेग पाहता ‘रॉकी’ इथेच थांबणार नाही, असे वाटते. प्रशांत नील दिग्दर्शित, या चित्रपटाने त्याच्या पहिल्या विस्तारित वीकेंडमध्ये म्हणजेच चार दिवसांत जगभरात रु. 551.83 कोटी (KGF Chapter 2 Box Office Collection) पेक्षा जास्त कमाई केली आहे. पडद्यावर यशच्या प्रत्येक स्टाईलवर ज्या पद्धतीने टाळ्या वाजत आहेत, त्यावरून RRR नंतर 1000 कोटींच्या क्लबमध्ये आणखी एक धमाकेदार एंट्री होणार आहे, हे स्पष्ट होते.(KGF 2 breaks RRR record)

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी हिंदी वर्जनने सर्व विक्रम मोडीत काढले, तर चार दिवसांत या चित्रपटाने केवळ हिंदी वर्जनमधून  189.45 कोटींची कमाई केली आहे. रविवारीही या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने फक्त हिंदीतून 50 कोटींची कमाई केली आहे.

यशसोबतच श्रीनिधी शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज या दिग्गजांच्या या चित्रपटाने रविवारी हिंदीशिवाय इतर भाषांमध्येही धुमाकूळ घातला आहे. देशभरात 4000 हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या KGF: Chapter 2 ने रविवारी कर्नाटकात रु. 15 कोटी, आंध्र आणि निजाम सर्किट्समधून रु. 16.80 कोटी, तमिळनाडूतून रु. 9.50 कोटी आणि केरळमध्ये रु. 7.50 कोटी कमावले. एक्स्टेंडेड वीकचा फायदा चित्रपटाला मिळाला आहे.

‘KGF 2’ ने दिल्ली/NCR, UP, बिहार, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मल्टिप्लेक्स तसेच सिंगल स्क्रीनवरही तो प्रचंड कमाई करत आहे. इतकेच नाही तर अनेक भागात गर्दी लक्षात घेऊन मल्टिप्लेक्समध्ये अधिक सीट असलेल्या ऑडीटमध्ये चित्रपट दाखवला जात आहे. अवघ्या 4 दिवसात हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे यात शंका नाही.

मात्र, सोमवारी होणाऱ्या पहिल्या कसोटीत या चित्रपटाचे काय होते हे पाहणे बाकी आहे. इथून हा चित्रपट किती कमाई करू शकेल हे ठरवले जाईल. KGF 2 च्या क्रेझचा अंदाज यावरून लावता येतो की ओडिशासारख्या छोट्या सर्किटनेही बंपर कमावले आहेत. तिकीट खडकीवर हा चित्रपट एक नवा इतिहास लिहित असून जगभरातील कमाईच्या बाबतीत तो ‘RRR’ आणि ‘बाहुबली’लाही मागे टाकण्याची शक्यता आहे.

हिंदी वर्जनमध्ये चार दिवसांत कमाई-
दिवस 1, 14 एप्रिल  – रु 53.95 कोटी
दिवस 2, 15 एप्रिल – रु. 45.00 कोटी
दिवस 3, 16 एप्रिल  – रु 40.50 कोटी
दिवस 4, 17 एप्रिल – रु 50.00 कोटी

जगभरात 551.83 कोटी कमाईचे तपशील-
पहिला दिवस, 14 एप्रिल – रु. 165.37 कोटी
दिवस 2,       15 एप्रिल  – रु. 139.25 कोटी
दिवस 3,       16 एप्रिल – रु. 115.08 कोटी
दिवस 4,       17 एप्रिल  – रु. 132.13 कोटी

महत्वाच्या बातम्या-
 KGF चे खरे किंग आहे प्रशांत नील, फक्त 3 चित्रपट केले आणि तिन्ही ब्लॉकबस्टर, अशी आहे पर्सनल लाइफ
KGF 3 कधी येणार? दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, जर तुम्हा सर्व प्रेक्षकांना..
KGF 2 मधील यशचा स्वॅग पाहून भडकला हा अभिनेता, म्हणाला, दिग्दर्शकाला आयुष्यभर तुरूंगात..
KGF 2 ने तोडले सर्व रेकॉर्ड, पहिल्या दिवशी केली तब्बल एवढ्या कोटींची कमाई, बॉलिवूडलाही टाकले मागे