Share

ketki chitale : प्रत्येक सणाच्या पुढे हॅप्पी लिहून सणाची माती करु नका; शुभेच्छा देणाऱ्यांवर केतकी चितळे संतापली

ketki chitale talking about diwali wishes |   मराठी अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असते. अनेकदा ती तिच्या मतांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकत असते. आता पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त तिने एक वक्तव्य केले आहे, जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सध्या सगळीकडे आनंदाच्या वातावरणात दिवाळी साजरी केली जात आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी, नेतेमंडळी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. असे असतानाच केतकीने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने दिवाळीनिमित्त ही पोस्ट केली आहे. तसेच यावेळी तिने काही लोकांवर निशाणा साधला आहे.

केतकीने पोस्ट शेअर करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसेच यावेळी तिने म्हटले आहे की आपण शुभेच्छा देताना जे काही इमोजी वापरतो ते सर्व चीनमध्ये नववर्षासाठी वापरले जातात. त्यामुळे ते इमोजी वापरताना आपण काळजी घ्यायला पाहिजे असे तिने म्हटले आहे.

प्रत्येक सणाच्या पुढे हॅप्पी लिहून सणाची माती करु नका. इच्छा आणि आनंद या दोन शब्दांमध्ये मोठा फरक आहे. हॅप्पी लिहून तुमच्यात आणि तुमच्या धर्मात फरक निर्माण करू नका. तुमचा धर्म विसरु नका. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, अशी फेसबूक पोस्टने शेअर केली आहे.

अशात अनेकांनी केतकीच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर तिला ट्रोलही केले आहे. एकाने तर तिच्याच जुन्या शुभेच्छांचा एक स्क्रीन शॉट पोस्ट केला आहे. त्यामध्ये तिने हॅप्पी दिवाली अँड स्टे सेफ असे म्हटले होते. त्यानंतर स्वत:ची सावरासावर करत ती म्हणाली माणूस चुकांमधूनच शिकत असतो.

केतकी सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. अनेकदा राजकीय घडामोडी किंवा एखाद्या मुद्यावर ती स्पष्टपणे मत मांडताना दिसत असते. अनेकदा वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलही केले जाते. असे असतानाही ती सोशल मीडियावर आपले मत मांडत असते.

महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटाकडून कोणाची लागणार वर्णी? फडणवीसांनी दिली माहिती
Hero Splendor : हिरोच्या ‘या’ बाईकने लोकांना लावलय वेड; एका महीन्यात रेकाॅर्डब्रेक विक्री, आकडा ऐकून हैराण व्हाल
Rishi Sunak : जावई ऋषी सुनक पंतप्रधान बनल्यानंतर सासरे नारायण मूर्तींनी दिली पहीली प्रतिक्रिया, म्हणाले…

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now