ketki chitale angry on trollers | अभिनेत्री केतकी चितळे सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह असते. अनेकदा ती वेगवेगळ्या मुद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत असते. ती आपले मत मांडत असताना कोणाचाही विचार करत नाही. त्यामुळे अनेकदा मत मांडल्यानंतर सोशल मीडियावर ती ट्रोलही होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे तिला जेलमध्येही जावा लागले होते. अशात देशात श्रद्धा मर्डर केसची चर्चा सुरु आहे. केतकीने या प्रकरणी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. पण तिने शेअर केलेल्या या स्टोरीवर एक इंस्टाग्राम युजरने कमेंट केली आहे.
तसेच केतकीने सुद्धा त्याच्या कमेंटला सडेतोड उत्तर दिले आहे. केतकी एक पोस्ट शेअर केली होती. ती म्हणाली होती की, मेरा अब्दुल ऐसा नहीं कर सकता. बरोबर आहे. कारण आप मेलं. जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबताना तरी कुठे पश्चाताप होत असेल ना?
तसेच पुढे ती म्हणाली होती की, कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा विचार केला तर अंगावर काटा येतो. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (यावेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात? अशी पोस्ट केतकीने केली होती.
अशात केतकीच्या या पोस्टवर एका तरुणाने कमेंट केली आहे. तो म्हणाला की. तरीही हिंदु मुली सुधारणार नाही, शेवटी कधीपर्यंत? तरुणाच्या या कमेंटला केतकीने एक उत्तर दिले हे. पण केतकीच्या उत्तरानंतरही त्यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. कारण तोही केतकीच्या उत्तरांना प्रत्युत्तर देताना दिसत होता.
त्याच्या कमेंटला केतकीने असे उत्तर दिले की,जेव्हा सनातनी मुलं सुधारतील. त्यावर तो तरुण म्हणाला की, आम्ही सनातनीच आहोत आणि हा सल्ला मुलींनाच चांगला वाटतो. जय श्री राम. त्यावर ती म्हणाली की, तुमच्या अशा वागण्यामुळे मुसलमान मुली तुमच्यावर प्रेम करत नाही. पण मुसलमान योग्य पद्धतीने मुलींना आपल्या प्रेमात पाडून पैसे कमवतात.
तसेच त्यानंतर केतकीने एक स्टोरीही शेअर केली होती. ती म्हणाली की, सनातनी मुलांनो, तुम्हालाही सुधरावं लागेल. तुम्ही जोपर्यंत तुमच्या खोट्या पुरुषार्थावर प्रेम करत राहाल, तोपर्यंत मुली अब्दुल, अफताब, अहमदसोबतच दिसून येतील. कारण मुलींना पटवण्यासाठी ते मुलींकडे लक्ष देतात. तुम्ही आधीच त्यांना नकार देतात आणि त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करतात. सध्या केतकीची ही पोस्ट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
dada bhuse : शिंदे गटातही पडली फूट! थेट मुख्यमंत्र्यांच्या समोरच उफाळून आली ‘या’ आमदारांची नाराजी
१८ वर्षांखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी; महाराष्ट्रातील ‘या’ ग्रामसभेत ठराव मंजूर
Aftab : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये असताना, ‘या’ डेटिंग ऍपच्या माध्यमातून अफताब शोधत होता नवी शिकार