Share

केतकी चितळे आता पक्की अडकली; आणखी एका गुन्ह्यात कोर्टाने केली पोलीस कोठडीत रवानगी

ketaki chitale

रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नवी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळे हिला ताब्यात  घेऊन अटक केली आहे. केतकीवर अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात २०२० मध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

यामुळे आता केटकीच्या अडचणी आणखी वाढलेल्या पाहायला मिळत आहे. मात्र, आठ महिन्यांपूर्वी तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून देखील तिला अटक केलेली नव्हती. अखेर गुरुवारी तक्रारदाराने पुन्हा मागणी केल्यानंतर तिला अटक केली. आता केतकीला याप्रकरणी ठाणे विशेष अट्रॉसिटी कोर्टाने 24 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

केतकीविरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1 मार्च 2020 रोजी केतकीने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. तिची फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते स्वप्निल गोविंद जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

आता त्या तक्रारीनुसार, केतकी चितळे हिच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकीच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे रबा‌ळे पोलिसांनी आता तिचा ताबा घेतला आहे. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात केतकीसोबत आणखी ३ जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याच समजत आहे. त्या तिघांचा शोध नवी मुंबई पोलीस कसून सोध घेत आहेत. नवी मुंबई पोलीस केतकीला आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सध्या केतकी चितळे हिच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करणारी फेसबुक पोस्ट केल्याचा आरोप आहे. बुधवारी तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिची तब्बल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या
‘जो नेता पंतप्रधानांवर टीका करताना घाबरत नाही, तो एका खासदाराच्या बडबडण्याने निर्णय बदलेल का?’
भाजपचा बडा नेता अडचणीत; मयताजवळ आढळलेल्या चिठ्ठीतून झाला खळबळजनक खुलासा
आता अण्णा हजारेंच्या विरोधातच होणार आंदोलन; ढोल बजाव, अण्णा हजारे जगाओ आंदोलनाची घोषणा
काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकला फाशी होणार कळताच पाकिस्तान संतापला, म्हणाला…

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now