राजकीय वातावरण तापलेलं असतानाच त्यात आता अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोस्टने आणखी भर पडली आहे. केतकी ही सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते. अनेकदा केतकी राजकीय मुद्यांना धरून देखील परखड मत मांडत असते. अनेकदा तिची वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली आहेत.
कायम चर्चेत असणारी केतकी चितळे आता पुन्हा अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा नेमकं प्रकरण काय..? काय आहे केतकीने केलेली वादग्रस्त पोस्ट..? वाचा सविस्तर संपूर्ण प्रकरण..
केतकीने यावेळी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. केतकीने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले, तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, सध्या तिच्या या फेसबुक पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/812055050/posts/10166554560880051/?app=fbl
अशातच आता केतकीच्या अडचणींमद्धे वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांचे साताऱ्यातील एक भाषण प्रचंड गाजलं होतं. या भाषणावेळी शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कष्टकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना सांगणारी कविता म्हटली. त्या कवितेत पवारांनी हिंदू देवतांचे बाप काढल्याची टीका भाजपने केली.
याच भाषणाच्या पार्श्वभूमीवर केतकीने पवारांवर टीका केली. पवारांनी भाषणावेळी म्हटलेल्या कवितेचा धागा पकडून केतकीने पवारांना ब्राह्मणद्वेष्टा म्हटलं आहे. ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू, तू तर मच्छर, अशा खालच्या शब्दात तिने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
तिने फेसबुक पोस्ट केली आणि लिहिले, तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे,समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड.’
महत्त्वाच्या बातम्या
..तर तुमचा आदित्य वरळीतच कायमचा मावळला असता; मनसेने सेनेला उपकारांची आठवन दिली करून
‘ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक..’; केतकी चितळेची शरद पवारांविषयी अत्यंत विकृत पोस्ट
मराठी अभिनेत्रीची पातळी घसरली; पवारांवर टीका करताना म्हणाली, सतरा वेळा लाळ गळे…
जेव्हा सिद्धार्थने ‘या’ अभिनेत्रीला किस करण्याची व्यक्त केली इच्छा, म्हणाला, ‘लोकांना ते आवडेल’