Deepak Kesarkar: आज पावसाळी अधिवेशनाचा सलग पाचवा दिवस आहे. आज सुरुवातीलाच विधानभवनाच्या परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटातील आमदारांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ, एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली. या गदारोळामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला होता.
या मोठ्या गोंधळानंतर सत्ताधारी शिंदे गटाचे प्रवक्ते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिल्याचे समोर आले. ५० खोके काय, ५० रुपये जरी घेतले असेल तर पदाचा राजीनामा देईल,’ अशा परखड शब्दात दीपक केसरकर यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीला प्रतिउत्तर दिले.
५० खोके एकदम ओके! विरोधकांच्या या घोषणेवर केसरकर नाराज असल्याचे दिसले. ते पुढे म्हणाले की, ‘सत्तेसाठी कोणी काय करावे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मी कोणाकडून ५० खोके काय, ५० रुपये जरी घेतलेत. हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. जर तुम्ही ते सिद्ध करून दाखवले तर, मी पदाचा राजीनामा देईल,’ असं दीपक केसरकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांचे कौतुक यावेळी केसकरांनी केले. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. खड्डे मुक्त रस्त्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना आधीपेक्षा खूप मोठ्या रकमेचा निधी दिला जाणार आहे.’
‘मग अशावेळी तुम्हाला त्याच प्रश्नांबाबत विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याचा अधिकार काय?’ असा उलट प्रश्न त्यांनी विरोधकांना केला. दरम्यान मागील ४ दिवसांपासून सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आंदोलन करत मोठी घोषणाबाजी केली. ‘५० खोके एकदम ओके!’ अशी घोषणा देत रान उठवले. आज मात्र विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी मैदानात उतरले.
थेट समोर येत ‘लवासाचे खोके एकदम ओके!,’ ‘वाझेचे खूप एकदम ओके!’ अशा घोषणा दिल्या. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या गोंधळात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे महेश शिंदे यांच्यात हाणामारी झाली. तसेच घाणेरड्या शब्दात शिंदेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप मिटकरींनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Pushpa 2: ‘पुष्पा २’ बाबत समोर आली मोठी अपडेट, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, चाहते उत्सुक
Uddhav Thackeray : विरोधकांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, मविआच्या बैठकीत झाला मोठा निर्णय
Tarak Mehta: तारक मेहता फेम शैलेश लोढांचा पत्ता झाला कट? मिळाला नवीन तारक मेहता? निर्माते म्हणाले..