मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते कोकणचे दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, शरद पवार आणि नारायण राणे या नेत्यांविषयी यापुढे काहीच बोलणार नाही, असे वक्तव्य केसरकरांनी केले आहे. ( kesarkar says, Nothing will be said about Pawar and Rane)
केसरकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, शरद पवार माझ्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्या विषयी मी कोणतीही टीका केली नव्हती. तीन वेळा शिवसेना कशाप्रकारे फुटली ही वस्तुस्थिती मी सांगत होतो. परंतु गैरसमज झाला असेल तर मी सिल्वर ओकवर जाऊन त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन.
नारायण राणे यांच्याशी माझा कोणताही वाद नाही. त्यांची मुले माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे, मी त्यांना लहान म्हणालो, परंतु त्याबद्दल त्यांची तक्रार असेल तर यापुढे त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु त्यांनीही थांबायला हवं. माझा राणेंशी वाद नाही. काही काम निघाले तर राणे यांना जाऊन भेटेल, असं केसरकर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे सैनिक आहेत. पुढील येणाऱ्या निवडणुका बाळासाहेबांचे शिवसैनिक शिंदे गट आणि भाजप जिंकतील, असेही दीपक केसरकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने कोकणचे राज्य आले आहे. आता विकासाला नवी दिशा मिळेल. सामाजिक बांधिलकी मानून, सामान्य लोकांचे प्रश्न अजेंड्यावर ठेवून, शिंदे सरकारने निर्णय घेतले आहेत, त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल.
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर गटाची बाजू मांडण्यासाठी त्यांनी आपल्या गटातील आमदार दीपक केसरकर यांना प्रवक्तेपदी नेमले. विरोधकांकडून, शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारची एकनाथ शिंदे आणि गटावर टीका झाल्यास त्याला उत्तर देण्याचे आणि तितक्याच उत्तम प्रकारे गटाची बाजू मांडण्याचे काम दीपक केसरकर करताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडणार? मुख्यमंत्र्यांनी केला धक्कादायक दावा
लग्नानंतर जास्तच बोल्ड झाली ‘ही’ अभिनेत्री; शेअर केले पतीसोबतचे प्राइवेट फोटो
धर्मापेक्षा श्रेष्ठ शिवभक्ती, सहाव्यांदा शंकराच्या मुर्तीवर गंगाजल वाहणार वकील मलिक, म्हणाला…