keral girl vinisha inspiring story | चांगले शिक्षण आता खुप महागडे झाले आहे. चांगले शिक्षण मुलांना देणे पालकांसाठी सोपे नसते. त्यासाठी अनेक पालक मेहनत घेताना दिसून येतात. पण चांगल्या शिक्षणासाठी एखादा विद्यार्थी मेहनत घेतोय हे क्वचितच पाहायला मिळत. केरळमध्ये अशीच एक विद्यार्थीनी पाहायला मिळाली आहे.
केरळमधील चेरथला येथील विनिशा शिक्षण घेण्यासाठी खुप मेहनत घेत आहे. आपल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थीनी कामही करते. १२वीत असलेली विनिशा कॉलेज संपल्यावर तिच्या कॉलेजच्या बाहेर शेंगदाणे विकते. विनिशा कॉलेजनंतर तिची शेंगदाण्याची गाडी घेऊन बाहेर पडते आणि शिक्षण सुटू नये म्हणून ती रात्री ८ वाजेपर्यंत शेंगदाणे विकते.
ती गरम तव्यावर मिठात शेंगदाणे मळून घेते आणि ते गरम शेंगदाणे विकून आपल्या शिक्षणासाठी लागणारा खर्च उचलते. बहिणीच्या लग्नानंतर कुटुंबावर मोठे कर्ज असल्याने विनिशाने शेंगदाणे विकण्यास सुरुवात केली. तिचे वडील मजूर असून आईही शेंगदाणे विकते.
शेंगदाणे विकताना तासनतास उभे राहिल्याने आईच्या पायात दुखू लागले होते. त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विनिशा स्वतः पुढे आली आणि शेंगदाणे विकण्याचा निर्णय घेतला. विनिशा गेल्या चार वर्षांपासून तिच्या पालकांना मदत करत आहे. विनिशा म्हणाली की, ती दुपारी साडेचार वाजता काम सुरू करते आणि रात्री ८ वाजता ते काम संपवते. शेंगदाणे विकल्यानंतर ती घरी जाऊन अभ्यास करते.
ती प्रामाणिकपणे काम करते. शेंगदाणे विकते, पण तिचे हे काम काही लोकांना आवडत नाही. त्यामुळे काही लोक तिची चेष्टाही करतात. काही लोक तिला पाखंडी आणि खोटारडी म्हणतात. तरीही, तिला तिची कमाई करण्यात आणि त्या अनुभवातून शिकण्याचा अभिमान वाटतो.
विनिशाने सांगितले की कॉलेजनंतर ट्यूशनला जायची इच्छा होते, पण तिला दोन्ही गोष्टी सांभाळणे कठीण होते. त्यामुळे ती कॉलेज सुटल्यानंतर काम करते आणि त्यानंतर घरी गेल्यावर अभ्यास करते. तिने इतर विद्यार्थीनींनाही आवाहन केले आहे. ती म्हणाला की, मुलींनी शक्य असेल, तर आपल्या शिक्षणाचा खर्च आपण स्वत:च उचलायला हवा.
महत्वाच्या बातम्या-
Trupti Desai : पुण्याचे राजकारणी इतके निर्लज्ज कसे झाले? विनायक निम्हणांच्या निधनाला २४ तासही झाले नाही तोच…
Eknath Shinde : राज्यातील प्रकल्प गुजरातला का जाताय? मुख्यमंत्री शिंदेंनी सोडलं मौन, म्हणाले…
Pune : पुणे तिथे काय उणे! तरुणाने पोलिसांचीच काढली चुक, दोन हजारांचे कापलेले चलन केले रद्द