केजरीवालांनी पंजाबमध्ये दाखवली ‘आम आदमी’ची पॉवर; मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाला बनवलं आमदार

पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. आम आदमी पक्षाला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने जल्लोष सुरु केला आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील पराभूत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.(Kejriwal showed the power of ‘Aam Aadmi’ in Punjab;)

मात्र त्यांना कुणी पराभूत केलं, यासंदर्भात आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी खुलासा केला आहे. त्या उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्या उमेदवाराचं नाव लाभसिंग उगोके असे आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनाच काँग्रेसने पुढील मुख्यमंत्रीपदाचे उमेद्वार म्हणून घोषित केले होते.

मात्र त्यांचा देखील पराभव झाला आहे. भदौरमधून लाभसिंग उगोके यांनी चरणजीतसिंग चन्नी यांचा पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची चर्चा सुरु आहे. आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विजयानंतर केलेल्या भाषणात उगोके यांच्याविषयी माहिती दिली.

पंजाबमध्ये ‘आम आदमी’ची खरी ताकद दिसल्याची चर्चा सुरु झाली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात उगोके यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली आहे. “तुम्हाला वाटेल, एक सामान्य व्यक्ती काय करू शकते? तुम्हाला माहिती आहे का की चरणजीत सिंग चन्नी यांना कुणी हरवलंय? भदौरच्या लाभसिंग उगोकेनी हरवलं आहे.

लाभसिंग उगोके मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात नोकरी करतात. त्यांची आई सरकारी शाळेत सफाई कर्मचाऱ्याचं काम करते. त्यांचे वडील शेतात मजुरी करतात. अशा व्यक्तीने चरणजीतसिंग चन्नी यांना निवडणुकीत हरवलं आहे”, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.

दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव करणाऱ्या जीवनज्योत कौर यांच्याविषयीही केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं आहे. “नवज्योतसिंग सिद्धू यांना आमची सामान्य कार्यकर्ती जीवनज्योत कौर यांनी हरवलं आहे. त्यांनी मजिठिया यांनाही हरवलं आहे. सामान्य माणसात मोठी ताकद आहे.

महत्वाच्या बातम्या
गावाकडच्या चार पोरांनी सुरू केली छोटी पानाची टपरी, आता उभे केले ३०० कोटींचे डेअरी साम्राज्य
माहिती कामाची! मार्चमध्ये ‘या’ भाज्यांच्या बिया लावा आणि मे मध्ये ताज्या भाज्या खा आणि निरोगी राहा