राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे १४ फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. मात्र अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे.
अण्णांच्या वयाचा विचार करून उपोषण मागे घेण्याची अण्णांना विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अण्णा हजारे आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धीत रविवारी ग्रामसभा झाली.
याचाच धागा पकडत दिग्दर्शक यांनी ट्विट केले आहे. केदार शिंदे यांनी अण्णा हजारे यांच्या उपोषणाची घोषणा आणि अचानक उपोषण स्थगित करण्याच्या निर्णयावर ट्वीट करत टोला लगावला. या ट्विटमध्ये त्यांनी अण्णा जेवायला जेवायला असं म्हणत ‘सही’ आणि ‘उपोषण’ असे दोन हॅशटॅग वापरले आहेत.
https://twitter.com/mekedarshinde/status/1492870785706651652?s=20&t=mWihEYPKjwgNwAQaNYEprQ
दरम्यान, रविवारी सभेदरम्यान यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ठराव करण्यात आला. त्याचसोबत अण्णांनी वयाचा विचार करून उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यावरून सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे, महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले होते.
केवळ राज्यात वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक, विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयमुळे लहान मुले आणि तरुण व्यसनाधीन होऊ शकतात. त्याचसोबत यामुळे महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही. याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
याचसोबत अण्णा हजारे म्हणाले की, युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद होईल अशा निर्णयाला विरोध करणे सोडून दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे. त्याचसोबत हे आश्चर्यकारक असल्याचे अण्णा हजारे म्हणाले होते. गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्राकडून कडाडून विरोध केला जात आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शवला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी असल्याचे अण्णांनी पत्रात म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का! कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात
राखी सावंतने दिले कंगनाला खुले आव्हान, सलमान भाईमध्ये खुप दम आहे, तुझ्यात जर असेल तर..
Valentine’s Day 2022: बॉलिवूडचे हे कपल्स झाले रोमॅंटिंक, फोटो शेअर करत पार्टनरबद्दल म्हणाले..
भररस्त्यात विष प्राशन करून दीर भावजयीने तडफडत सोडला जीव, औरंगाबादमधील धक्कादायक घटना