मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. तसेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. अनेकदा ते राजकीय विषयांवर देखील सविस्तर मत मांडताना दिसतात. आता पुन्हा एकदा त्यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. प्रेक्षकांना आता या चित्रपटाचे वेध लागले आहे. याबद्दलच केदार यांनी केल पोस्ट केली आहे.
तसेच काही दिवसांपूर्वीच सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा केदार शिंदे, अंकुश शिंदे उपस्थित होते. याचबरोबर यावेळी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टिझर दाखवण्यात आला. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी असल्याचे जाहीर होताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. या चित्रपटाला अजय अतुल यांचे संगीत असणार आहे. अशातच आता राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. केदार यांची ती पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
https://www.instagram.com/p/CdYgOJrNp90/?utm_source=ig_web_copy_link
वाचा काय म्हंटलं केदार यांनी पोस्टमध्ये..? पोस्टमध्ये महाराष्ट्र शाहीर या त्यांच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर आणि राज ठाकरे दिसत आहेत. राज त्या पोस्टरकडे निरखून पाहत आहेत. हा फोटो शेअर करत केदार शिंदे म्हणाले, “आपल्या कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार… मनस्वी आनंद”.
दरम्यान, केदार यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यागत व्हायरल झाली आहे. केदार यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार आहेत. याशिवाय ते राज्याच्या राजकारणातील आक्रमक नेते म्हणून देखील ओळखले जातात.