Kaushik lm | प्रसिद्ध चित्रपट समीक्षक कौशिक एलएम यांचे निधन झाले आहे. सोमवारी चित्रपट समीक्षक कौशिक एलएम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कौशिक हे LM चित्रपट समीक्षक तसेच प्रभावशाली, YouTube व्हिडिओ जॉकी आणि एंटरटेनमेंट ट्रॅकर होते.
त्यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण तामिळ आणि तेलुगु सिनेजगतातील अनेक स्टार्सना धक्का बसला आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांच्या आकस्मिक निधनावर शोक व्यक्त केला आहे. चित्रपट समीक्षक कौशिक एलएम यांच्या निधनानंतर साऊथ सिनेसृष्टीतील सर्व स्टार्सना धक्का बसला आहे.
कौशिक एलएम यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. लायगर या चित्रपटामुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला अभिनेता विजय डोवरकोंडा यानेही ट्विट करून कौशिक एलएम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्विट केले आहे की, तुझ्याबद्दल विचार करत आहे आणि देवाला प्रार्थना करत आहे.
एलएम कौशिक, तुझी खूप आठवण येईल. त्याचवेळी दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेशनेही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कीर्ती सुरेशने ट्विट केले आहे की, ही बातमी ऐकल्यानंतर माझ्याकडे शब्द नाहीत. हे धक्कादायक आहे!! मी मनापासून त्याच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! कौशिक, तू या जगाचा निरोप घेतलास यावर विश्वास बसत नाही! #RIPKaushikLM.”
या दोन स्टार्सशिवाय, चित्रपट निर्माते व्यंकट प्रभू यांनी कौशिक एलएम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘ओएमजी! विश्वास बसत नाही! काही दिवसांपूर्वीच त्याच्याशी बोललो! जीवन खुपच अनपेक्षित आहे! हे योग्य नाही! कौशिक यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना! खूप लवकर गेला मित्रा.
त्याच्याशिवाय अभिनेत्री रितिका सिंगनेही ट्विटर पोस्ट शेअर केली आहे. तीने ट्विट केले की, “मी जड अंतःकरणाने हे लिहित आहे. मी @LMKMovieManiac ला मुलाखतीसाठी अनेक वेळा भेटले. तो नेहमी खूप छान बोलत असे. नवीन कलाकार म्हणून त्याने माझे स्वागतही केले. माझ्या संवेदना त्याच्या कुटुंबासोबत आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे कौशिक एलएम यांच्या आकस्मिक निधनानंतर सर्व सेलेब्स शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नाही.
महत्वाच्या बातम्या
Movies: तो चित्रपट ज्याने बंगाल दंगलींची करून दिली होती आठवण, पण ‘या’ कारणामुळे झाला बॅन
Nitish Kumar: अमित शहांचा ‘तो’ शेवटचा फोन आणि नितीश कुमारांची अट, नंतर ९ दिवसात झाला राजकीय भूकंप
Mukesh Ambani: अंबानी कुटुंबाला २ तासात ८ वेळा फोन करून जीवे मारण्याची धमकी देणारा विष्णू भौमिक कोण आहे?
राज्याचे नवीन शिक्षणमंत्री दीपक केसरकराचं शिक्षण किती झालंय माहिती का? वाचून आश्चर्य वाटेल