Share

katrina kaif ने शेअर केले बिकीनीवरील Photos, विक्की कौशलशिवाय मालदीवमध्ये करतेय ऍन्जॉय

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या मालदीवमध्ये आहे, पण चाहत्यांसाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मालदीवमध्ये विकी कौशलसोबत नाही. वास्तविक, विकी सध्या इंदोरमध्ये असून लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यात सारा अली खान देखील मुख्य भूमिकेत आहे.(Katrina Kaif shared Photos on bikini at maldiv)

विकीशिवाय कतरिना मालदीवमध्ये पोहोचली आहे. ती तिथे खूप एन्जॉय करत आहे आणि आता तिने बिकिनीमधले तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची टोन्ड बॉडी आणि किलर लूक पाहून चाहते दंग झाले आहेत. कतरिना कैफने कलर ब्लॉक बिकिनीमधील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिने वरून ट्रान्सपरंट व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे.

डोक्यावर हात ठेवून ती किलर पोज देत आहे. तिची इतकी जबरदस्त फॅन फॉलोअर्स (Fan followers) आहे की अवघ्या 1 तासात 7 लाखांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. कतरिना एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मालदीवमध्ये गेली होती. दरम्यान, ती तिच्या बीजी वेळापत्रकातून वेळ काढून निसर्गाचा आनंद घेत आहे.

https://www.instagram.com/p/CZJdhkese2J/?utm_source=ig_web_copy_link

तिने इन्स्टाग्राम स्टेटसवर एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक पोपट तिच्या हातावर बसलेले आहेत. ती त्यांना खाऊ घालते. यादरम्यान तिचा आनंद पाहायला मिळत आहे. कतरिना आणि विकी त्यांच्या हनीमूनसाठी मालदीवमध्ये आले होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दोघेही मालदीवला रवाना झाले होते.

दोघांनीही सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी 9 डिसेंबरला राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केले होते. विकी सध्या इंदोरमध्ये असला तरी कतरिना त्याला भेटण्यासाठी तिथे पोहोचली होती. दोघांनीही आपली पहिली लोहरी एकत्र साजरी केली. एकत्र क्वालिटी टाइम घालवल्यानंतर कतरिना मुंबईत परतली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना लवकरच अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये ‘मेरी ख्रिसमस’ आणि ‘टायगर 3’चा समावेश आहे. या व्यतिरिक्त, चाहत्यांना कतरिना आणि विकीला पडद्यावर एकत्र पाहायचे आहे, परंतु अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now