Share

कतरिनाने शेअर केला स्विमिंग पूलमधील पती विकीसोबतचा रोमँटिक फोटो; म्हणाली, मी आणि माझा…

Katrina Kaif

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडपे आहेत. ज्या दिवशी हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत तेव्हापासूनच ते कायम माध्यमात चर्चेत आहेत. या दोघांचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतो. तसेच त्यांच्यासंबंधित प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाही चाहतेही नेहमी उत्सुक असतात.

यादरम्यान विकी-कतरिनाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत विकी-कतरिना स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत विकी शर्टलेस असून कतरिना व्हाईट कलरच्या स्विमसूटमध्ये दिसून येत आहेत. तसेच विकी आणि कतरिना स्विमिंग पूलमध्ये एकमेकांना मिठी मारत कॅमेऱ्याला पोझ देताना या फोटोत दिसून येत आहेत.

या फोटोसोबत कतरिनाने ‘मी आणि माझा’ असे कॅप्शन दिले आहे. तर विकी-कतरिनाच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. कतरिनाने फोटो शेअर करण्याच्या अवघ्या तीन तासातच या फोटोला २० लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या या फोटोला पसंती दर्शवत कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, विकी-कतरिना ९ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले होते. राजस्थानमधील सिक्स सेन्सस फोर्ट बटवारा येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या दोघांच्या लग्नात कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मंडळी उपस्थित होते. त्यांच्या लग्नाची सर्वत्र खूप चर्चा झाली. तसेच त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

लग्नानंतर विकी-कतरिना बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि क्यूट कपलपैकी एक झाले. नुकतीच काही दिवसांपूर्वी दोघेही व्हेकेशनला गेले होते. डोंगर, झाडेझुडुपे, समुद्र अशा निसर्गाच्या सानिध्यात दोघांनी त्यांचा व्हेकेशन एन्जॉय केला होता. यादरम्यानच फोटो विकी आणि कतरिनाने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला होता. त्यांच्या या फोटोंनाही चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती.

दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास कतरिना लवकरच ‘मेरी ख्रिसमस’, ‘फोन भूत’, ‘जी ले जरा’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दुसरीकडे विकी ‘सैम बहादुर’, ‘गोविंदा मेरा नाम’, ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’, ‘तख्त’ आणि ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ यासारख्या चित्रपटात दिसणार आहे. सध्या तो सारा अली खानसोबत एका चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
शाहरूख खानसोबतच्या भांडणावर पहिल्यांदाच अजय देवगनने सोडले मौन, म्हणाला, आम्ही दोघं..
VIDEO: गरीब मुलांनी ‘या’ अभिनेत्याला प्रेमाने मारली मिठी, अभिनेत्याची प्रतिक्रिया पाहून चाहते झाले भावूक

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now