सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची नुकतीच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली गेली आहे. या दोघांनी सर्वांच्या साक्षीने आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. या दोघांचा विवाहसोहळा राजस्थान मधील सवाई माधोपूर याठिकाणी पार पडला आहे. परंतु लग्नाचे काही दिवस उलटून गेल्यानंतर कतरिना कैफ गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नुकताच सोशल मीडियावर कतरिना कैफचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तिने आपल्या बाळाविषयी मोठा खुलासा केला आहे. तसेच तिने आपल्या भूतकाळातील काही वाईट गोष्टी सर्वांना शेअर केल्या आहेत. त्यामुळे तिच्याविषयी चाहत्यांच्या मनात एक सहानभुती निर्माण झाली आहे.
या व्हिडिओत कतरिना कैफने म्हणले आहे की, “माझ्या मुलांना त्यांचे आई-वडील दोघांची सोबत मिळावी, अशी माझी इच्छा आहे. मी लहान असताना माझी आई सुझैन आणि वडील मोहम्मद कैफ यांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे मला माझ्या आयुष्यात वडिलांची उणीव नेहमीच जाणवते. माझ्या आईने एकटीनेच आठ मुलांचा सांभाळ केला”
तसेच, “मला माझ्या आयुष्यात नेहमीच वडिलांची उणीव जाणवते. मी याकाळात फार दु:ख सोसलं आहे. त्यामुळे माझ्या मुलांना ही कमतरता कधीही जाणवू नये, असे मला वाटतं. वडील नसल्यानंतर तुमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते, ती कोणीही भरुन काढू शकत नाही.
त्यामुळे जेव्हा मला मुलं होतील, तेव्हा त्यांना अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही याची मी विशेष काळजी घेईन.” असे कतरिना कैफने सांगितले आहे. पुढे बोलताना, “माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी असे अनेक भावनिक क्षण आले, ज्याचा मला खूप त्रास झाला. ज्यांना वडील आहेत आणि ज्या लोकांना दोन्हीही पालकांचे प्रेम मिळाले आहे.
पण हे तितकंच खरं आहे की, मला इतक्या बहिणी असल्यामुळे माझ्याकडे नेहमीच स्वतःची गर्ल गँग होती. मला मैत्री करण्यासाठी कधीही घरातून बाहेर पडावे लागले नाही. मला माझ्या वयाच्या ६० व्या वर्षी स्वत:च्या मुलं आणि त्यांच्या मुलांच्या मुलांसोबत खेळायचे आहे” अशी इच्छा कतरिना कैफने व्यक्त केली आहे. कतरिना कैफची ही इच्छा ऐकून चाहते देखील भावूक झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
भोजपुरी अभिनेत्रीने धरला चंद्रा लावणीवर ठेका, मराठमोळ्या सौंदर्याने पाडली चाहत्यांना भुरळ
पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल; “तो कोणता पंजा होता जो 1 रुपयातून 85 पैसे घासून घेत होता”
मोठी बातमी! अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अजामीनपात्र गुन्हा असल्याने तुरूंगात जावे लागणार
“स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने राज ठाकरेंचा थयथयाट”