Share

Katrina Kaif: कतरिना कैफ बनणार आई? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच, चाहते म्हणाले…

katrina kaif baby bump video | कोणती अभिनेत्री तिच्या खाजगी आयुष्यामुळे कधी चर्चेत येईल हे सांगता येत नाही. आता प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सुद्धा चांगलीच चर्चेत आहे. तिच्या चर्चे मागचे कारण एखादा चित्रपट नसून तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या आहे. कतरिना ही प्रेग्नेंट असल्याचे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर याबाबत चर्चा असली तरीही कतरिनाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशा परिस्थितीत आता कतरिना कैफ मुंबई विमानतळावर दिसून आली होती. यावेळीचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिची स्थिती पाहून पुन्हा एकचा तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा होऊ लागल्या आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये कतरिना जॉली कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कतरिना ट्रॅक पँट आणि डेनिम जॅकेटमध्ये अगदी साध्या लूकमध्ये आहे.

कतरिनाने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स सुद्धा घातलेले आहे. कतरिनाचे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. एकाने असे म्हटले की, अभिनेत्रीने तिचा बेबी बंप हुशारीने लपवला आहे. तर एकाने म्हटले की तिला पाहून असे वाटत आहे की ती लवकरच आई होणार आहे.

कतरिनाने तिच्या सुरक्षेसाठी चेहऱ्यावर मास्कही लावलेला होता. कतरिना तिच्या शूटिंगसाठी कुठेतरी जात असल्याचे लक्षात येत आहे. कतरिनाच्या या कॅज्युअल लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आता सलमान खानसोबत टायगर ३ मध्ये दिसून येणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कतरिना प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. मात्र ती आणि तिचा पती विकी कौशल या दोघांनीही प्रेग्नेंसीबद्दल काहीही स्पष्ट केलेलं नाही, ज्याप्रमाणे कतरिनाने लग्नाबाबत गुप्तता ठेवली होती. तशीच ती प्रेग्नेंसीबाबतही गुप्तता ठेवत असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
…त्यामुळे शिंदे गटाचे सगळे आमदार अपात्र होणार; बड्या नेत्याने सांगीतली कायद्याची मेख
Tejas Thackeray: तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरु असताना मिलिंद नार्वेकरांचे खास ट्विट; म्हणाले…
दिपक केसरकरांचे नारायण राणेंपुढे सपशेल लोटांगण; म्हणाले यापुढे त्यांच्याविषयी…

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now