मागील काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलचे लग्न झाले आहे. या दोघांनीही गुपचूप लग्न केले. त्यानंतर या दोघांनीही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना हा सुखद धक्का दिला होता. लग्नानंतर अनेक वेळा हे जोडपं कॅमेरा समोर आले आहे.
त्याचबरोबर आणखी एका हे जोडपं स्पॉट झाले आहे. कॅटरीना आणि विक्कीची ही लग्नानंतरची पहिली होळी आहे. याच दरम्यान, आज म्हणजेच शुक्रवारी (१८ मार्च) सकाळी या दोघांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दोघेही खूप रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. खरंतर, हे दोघेही काल म्हणजे गुरुवारी (१७ मार्च) रात्री एका पार्टीत गेले होते. जिथे दोघांनी एकमेकांचा हात धरून एन्ट्री घेतली होती.
या व्हिडिओमध्ये कॅटरीना निळ्या रंगाच्या बॉडीकॉन शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर विक्कीने देखील रेट्रो लुकसह ब्लेझर परिधान केले होते. ज्यामध्ये तो अतिशय डॅशिंग स्टाईलमध्ये दिसत होता. कारमधून खाली उतरताच दोघांनी एकमेकांचा हात धरला होता. त्याचबरोबर या जोडीची ही स्टाइल पॅपराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
खरंतर दोघेही काल म्हणजे गुरुवारी (१७ मार्च) रात्री धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत गेले होते. याच दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओला चाहते लाइक्स आणि कमेंट्स करत प्रेम व्यक्त करत आहेत.
मात्र यादरम्यान सर्वांचे लक्ष विक्की कौशलकडे आहे. कारण तो एक पती म्हणून पत्नीची किती काळजी करतो. याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. संपूर्ण व्हिडिओमध्ये तो पत्नीच्या कम्फर्टची काळजी घेताना दिसत आहे. तसेच कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी खरा जोडीदार शोधल्याबद्दल कॅटरीनाचे अभिनंदन केले. तर एकाने ‘मेड फॉर एच अदर’ असे लिहिले.
या दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर की, सध्या विक्की कौशल आणि कॅटरीना कैफ त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. विक्की लवकरच त्याच्या आगामी तीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर कॅटरीना देखील लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे.