Katrina Kaif, Vicky Kaushal, Karwa Chauth, Photos/ करवा चौथच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हा दिवस प्रत्येक विवाहित महिलेसाठी खूप खास असतो. बॉलिवूडचे पॉवर कपल विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच पहिल करवा चौथ होत. पतीच्या दीर्घायुष्यासाठी अभिनेत्रीने उपवास केला होता. कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर करवा चौथचे फोटो शेअर केले आहेत.
फोटोमध्ये लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर विकी कुर्ता पायजमामध्येही देखणा दिसत आहे. कतरिनाने विकी कौशलसोबत पहिला करवा चौथ साजरा केला. कतरिनाने विकीसोबतच तिच्या सासूसोबतचे क्यूट फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये कतरिना पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे.
अभिनेत्री तिच्या पतीसोबत एका फोटोमध्ये खूप खुश दिसत आहे. तर एका फोटोत ती करवा चौथची पूजा करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना लिहिले आहे की, पहिल करवा चौथ. अभिनेत्रीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या आयुष्यातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.
दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले होते. दोन्ही लव्हबर्ड्स एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अभिनेत्री प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करते. लग्नानंतर कतरिना कैफचा हा पहिला करवा चौथ आहे.
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अभिनेत्रीने करवा चौथचे पहिले व्रत ठेवले होते. कामाच्या आघाडीबद्दल बोलायचे झाले तर, कतरिना आणि विकी कौशल त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. सध्या कतरिना तिच्या ‘फोन भूत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले.
महत्वाच्या बातम्या-
लग्नाच्या काही दिवसातच कतरिना कैफकडून फॅमिली प्लॅनचा खुलासा; म्हणाली, जेव्हा मला मुलं होतील…
प्रसिद्धीपासून दूर राहून कतरिना कैफ करतेय ‘हे’ काम; ऐकून तुमचे होश उडतील
Katrina Kaif: कतरिना कैफ बनणार आई? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच, चाहते म्हणाले…