सध्या सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल हा चित्रपट चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ तर अनेकजण विरोधात आपल मत मांडत आहेत. या चित्रपटाला मुद्दाम दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे.
पण चित्रपटातील बराचसा भाग काल्पनिक आहे, अशी टीकाही दुसरीकडे केली जात आहे. विशेष म्हणजे काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय. या चित्रपटावरुन चांगलाच वादही होत असल्याचे दिसून येते. अशातच काश्मीरमध्ये राहणाऱ्या पंडितांनी या चित्रपटाबद्दल आपली मत मांडली आहे.
याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने काश्मीरमध्ये राहणाऱ्या पंडितांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. हा चित्रपट राजकीय हेतूने बनवल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत सांगताना ते म्हणतात, ‘हा चित्रपट म्हणजे २०२४ साठीचा इलेक्शन स्टंट वाटतोय, असा आरोप काश्मीरमध्ये राहणाऱ्या पंडितांनी केला आहे.
ते म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे २०२४ साठीचा इलेक्शन स्टंट वाटतोय. हे जगभरात जातील आणि म्हणतील की पाहा काश्मिरी पंडितांवर अत्याचार झालेत. पाकिस्तानने आम्हाला उद्धवस्त केलं. त्यांनी दहशतवादी घुसवले. त्यावेळी सामान्य मुस्लीम यामध्ये नव्हता. मुस्लिमांना पण मारण्यात आलंय.”
दरम्यान, ‘द कश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांमुळे जी दरी आम्ही मिटवलीय ती पुन्हा वाढण्याची भीती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हंटलं आहे की, मी इतर चित्रपट निर्मात्यांना विनंती करतो की दोन्ही बाजू मांडून त्यांच्यावरही जे अत्याचार झालेत ते आणि आमच्या जखमांवर प्रकाश टाकणारा चित्रपट बनवावा.’
तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपवर शाब्दिक निशाणा साधला आहे. आठ वर्षांपासून भाजपाचं सरकार आहे. ते इतर सराकारांना आरोप करायचे की त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी काश्मिरी पंडितांना उद्धवस्त केलं. मात्र या सरकारनेही आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाही. काश्मिरी पंडितांचं आजही शोषण केलं जात असल्याचा आरोप देखील काश्मीरमध्ये राहणाऱ्या पंडितांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
रंगाचा बेरंग ! सोसायटीच्या धुलिवंदनात बेधुंद होऊन नाचला, घरी पोहोचल्याच्या थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू
राष्ट्रवादी आणि एमआयएम युती करण्याच्या तयारीत? इम्तियाझ जलील आणि राजेश टोपे यांच्यात खलबतं
मागील ३० वर्षात काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन का झाले नाही? काय होती मुख्य कारणे?
‘भाभी जी घर पर है’ मालिकेतील हप्पु सिंग एका एपिसोडचे घेतो तब्बल ‘इतके’ पैसे; वाचून बसेल धक्का