जम्मु काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित असलेल्या एका महिला शिक्षिकेची हत्या केली आहे. संबंधित महिला ही पीएम पॅकेजवरुन भरती झाली होती. त्यानंतर तिने कुलगाममध्ये शाळा जॉईन केली होती. (kashmir pandit teacher murder)
ही महिला कुलगाममध्ये शिक्षिका होती आणि १९९० मध्ये पलायन केल्यानंतर तिला पुन्हा बोलावून पीएम एम्प्लॉयमेंट पॅकेज अंतर्गत काश्मीरमध्ये नोकरी देण्यात आली. काश्मीर खोऱ्यातील स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी शाळेत घुसले आणि त्यांनी आधी शिक्षिकेला तिचे नाव विचारले आणि नंतर तिच्यावर एके-४७ ने गोळ्या झाडल्या.
मंगळवारी सकाळी अज्ञात दहशतवाद्यांनी शाळेत गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर महिला शिक्षिकेला कुलगाम येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्या शिक्षिकेला मृत घोषित केले. रजनी असे मृत शिक्षिकाचे नाव असून ती सांबा येथील रहिवासी होती.
काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी मंगळवारी सकाळी कुलगामच्या गोपालपुरा भागात असलेल्या एका हायस्कूलच्या शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या होत्या. गोळी लागल्याने महिलेला कुलगाम येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
या घटनेनंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. त्याचवेळी कुलगाम जिल्ह्यातील रुग्णालयात लोकांची मोठी गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
कुलगामच्या घटनेने खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडलेल्या महिलेलाही पीएम स्पेशल एम्प्लॉयमेंट पॅकेजवर घाटीत पाठवण्यात आलं होतं. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या या महिलेचे कुटुंब १९९० मध्ये खोऱ्यातून स्थलांतरित झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
कॉंग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार अन् सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य
गुजरात टायटन्ससाठी ‘हा’ खेळाडू ठरला मॅच विनर, जिंकवून दिले तब्बल ९० टक्के सामने
काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी नाही म्हणून बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; केले ‘हे’ गंभीर आरोप