‘काश्मिर फाईल्स’ गंगुबाई काठियावाडीचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर, चौथ्या दिवशीही जबरदस्त कमाई

विवेक अग्निहोत्रीचा (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाइल्स’ बॉलीवूडच्या बॉक्स ऑफिस रेकॉर्डला पुन्हा परिभाषित करत आहे. छोट्या प्रमाणावर प्रमोशन केलेला हा चित्रपट आता थिएटरमध्ये ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत हा चित्रपट मुख्यत्वे महानगरांतील लोकांना आकर्षित करत होता, पण आता चित्रपटाने देशभरातील लोकांना चित्रपटगृहांना भेट देण्यास भाग पाडले आहे.(Kashmir Files also made huge profits on the fourth day)

‘द काश्मीर फाइल्स’ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 3.25 कोटींची कमाई केली. मात्र जसजसे दिवस जात आहेत, तसतशी चित्रपटाची कमाई मात्र वाढत आहे. या चित्रपटाने वीकेंडला एकूण 22.25 कोटींची कमाई केली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने रविवारचाही विक्रम मोडला आणि चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी जबरदस्त उडी घेतली.

द कश्मीर फाइल्स

या चित्रपटाने एकूण 43.15-45.15 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ मंगळवारी 20 कोटी रुपयांचा टप्पा गाठून आणखी चांगली कामगिरी केली असेल अशी अपेक्षा आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिवसानुसार कलेक्शन
शुक्रवार – रु. 3.25 कोटी
शनिवार – रु. 8.25 कोटी
रविवार –  रु. 14 कोटी
सोमवार – रु. 18 कोटी

रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट सुरुवातीला 700 स्क्रीन्समध्ये रिलीज झाला होता. काश्मिरी पंडितांच्या वेदनादायक कथा जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता पाहून, ‘द काश्मीर फाइल्स’ साठी बॉक्स ऑफिसने त्याचे प्रदर्शन 1000 हून अधिक स्क्रीनवर वाढवले. आठवड्याच्या शेवटी, ही संख्या 2000 पर्यंत वाढविली गेली.

द कश्मीर फाइल्स

काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांसारखे कलाकार आहेत. चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडणाऱ्यांना अश्रू आवरता येत नाहीत, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
द काश्मीर फाईल्स चा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ; आत्तापर्यंत केली एवढ्या कोटींची कमाई
कश्मीरी पंडीतांच्या हत्याकांडावेळी भाजपचे ८५ खासदार काय करत होते? त्यांच्या पाठींब्यावर सरकार होते
बुम बुम बुमराहने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले अनोखे त्रिशतक
तू बोल्ड फोटोशूट का करत नाहीस? चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनने दिले असे उत्तर