जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांत ४ दहशतवादी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. शोपियान जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताला गोळ्या घालून जखमी केले. त्याचवेळी श्रीनगरमधील लाल चौकाजवळील मैसुमा भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तर एक तरुण जखमी झाला. (kashmir 4 terrorist attacks)
त्यानंतर दुपारी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांना गोळ्या घातल्या. दोघेही बिहारचे रहिवासी होते. तर रविवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून पंजाबमधील दोन जणांना जखमी केले. खोऱ्यात एका दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. त्याचवेळी सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडित दुकानदारावर गोळीबार करून त्यांना जखमी केले. दहशतवादी हल्ल्यात शोपियानमधील छोटीगाम गावातील बाळ कृष्णा यांच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घोषित केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीर पंडित दुकानदारावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिस गावात पाठवण्यात आले. तसेच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. श्रीनगरमधील लाल चौकाजवळील मैसुमा भागात सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला तर दुसरा जवान जखमी झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी मैसुमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला, त्यात दोन जवान जखमी झाले. जखमींना SMHS रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी एका जवानाला मृत घोषित केले, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.
त्याआधी शोपियान गावात दहशतवाद्यांनी दोन दुसऱ्या राज्यातील मजुरांना गोळ्या घालून जखमी केले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत दहशतवादी दुसऱ्या राज्यातील लोकांवर हल्ले करत आहे. ते म्हणाले की, पुलवामा येथील लाजुरा येथे सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी पटलेश्वर कुमार आणि जाको चौधरी यांच्यावर गोळीबार केला. दोघेही बिहारचे रहिवासी आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच दहशतवाद्यांना पकडण्यात येईल. त्याआधी रविवारी संध्याकाळी पुलवामाच्या नौपोरा भागात दहशतवाद्यांनी दोन मजुरांवर हल्ला केला होता. ते दोघेही पंजाबचे रहिवासी होते.
महत्वाच्या बातम्या-
‘राऊतच कशाला, उद्या ठाकरेंवरही कारवाई होऊ शकते, त्यांनीही काळा पैसा जमा केला असेल’
त्याला लाज नाही वाटत बाळाला पोटाशी बांधून.., प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
अहमद पटेलांचा मुलगा काँग्रेस ठोकणार रामराम? थेट पक्ष नेतृत्वावरच टाकला बॉम्ब, उडाली एकच खळबळ