Share

करुणा शर्मा यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, जातीवाचक शिवीगाळ आणि नैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची कथित पत्नी करुणा शर्मा या नेहमीच चर्चेत असतात. त्या सतत धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करत असतात. मात्र आता त्या वेगळ्या कारणाने चर्चेत आल्या आहेत. करुणा शर्मा यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

करुणा शर्मा यांच्यासह अजयकुमार देडेवर यांच्यावर देखील पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबीक छळ अशा विविध कलमान्वये करुणा शर्मा आणि अजय देडेवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३२ वर्षीय महिलेने ही तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करुणा शर्मा यांनी पीडितेस हॉकीस्टीकचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच पिडीतीने तिच्या पतीला घटस्फोट द्यावा यासाठी करुणा शर्मांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तर, पिडीतेचा पती अजय कुमार विष्णू देडे याने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, अशी तक्रार पिडीत महिलेने केली आहे.

तसेच पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्माबरोबर झाली. ती आपली ओळख करुणा मुंडे असेच करुन देत होती. फिर्यादीचा पती त्यानंतर वारंवार करुणा शर्माच्या घरी राहू लागला.

त्यानंतर फिर्यादी व त्यांचा पती पुण्यात येऊन स्थायिक झाले. पती हा शर्माची वारंवार बोलत होता. १६ फेब्रूवारी २०२२ रोजी कार्यक्रमाला जायचे म्हणून पतीने फिर्यादी आपल्या पत्नीला भोसरी येथे नेले. तेव्हा तिथे करुणा शर्मा हिने हाॅकीस्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केल, असे पीडित महिलेने सांगितले.

दरम्यान, करुणा शर्मा यांनी गेल्या वर्षभरापूर्वी स्वतः ला धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडेंनी देखील गेल्यावर्षी फेसबुक पोस्ट टाकून आपण करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंध होते, अशी कबुली दिली होती. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. तेव्हापासून करुणा शर्मा या नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्याने चर्चेत येत असतात.

इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now