ठाकरे सरकारने राज्यातील आमदारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईत ३०० आमदारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व आमदारांचे मुंबईसारख्या शहरात कायमस्वरूपीचे वास्तव्य असावे, अशी आमची इच्छा आहे. (karuna munde on uddhav thackeray)
राज्यात १९९५ मध्ये शिवसेनेचे सरकार आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याची योजना सुरू केली होती, याची आठवण मुख्यमंत्री ठाकरे यांनी करून दिली. मुंबईत झोपडपट्टीचे अनेक प्रकल्प सुरू असल्याचेही उद्धव ठाकरे त्यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकारच्या या निर्णयावरुन अनेक नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. या निर्णयाला सामाजिक क्षेत्रातून विरोधही होत आहे. आता ठाकरे सरकारच्या या निर्णयावर मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
काही दिवसांपूर्वीच आमदारांच्या मानधनात वाढ झाली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगारही वाढला आहे. आता आमदारांसाठी घरं बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. त्यांना गोरगरीबांनी निवडणून दिलं आहे आणि पण ते आमदारांना घरं बांधून देत आहे, अशी टीका करुणा मुंडे यांनी केली आहे.
मुंबईतील आझाद मैदानात आजही आरोग्य सेविकांपासून एसटी कर्मचारी, ग्रामीण भागांत तळागाळात काम करणारे अनेक शिक्षक बेमुदत उपोषण करत आहे. फक्त १० ते १२ हजार रुपयांच्या पगारासाठी त्यांना उपोषण करावं लागत आहे. त्यांचा साधा आवाजही मुख्यमंत्र्यांना ऐकू जात नाही, हे खुप भयंकर आहे, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
तसेच मी स्वत: एका आमदाराची पत्नी आहे. माझा नवरा १५ वर्षांपासून आमदार आहे. एकेका आमदाराकडे किती प्रॉपर्टी असते ते मला माहिती आहे. आज अनेक आमदारांकडे कोट्यवधी आणि अब्जावधींची प्रॉपर्टी आहे. असे असतानाही त्यांना घरं दिली जात आहे. उद्धव ठाकरे आमदारांना घरं देण्यासाठी मुख्यमंत्री झाले की गोरगरीबांचे दु:ख दूर करण्यासाठी झालेत, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर प्रताप सरनाईकांची पहिली प्रतिक्रिया; केला खळबळजनक खुलासा, म्हणाले..
“आमदारांना मोफत घरं कशाला? सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा”
शरद पवारांच्या नातवाचे दुबईमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचे फोटो झाले व्हायरल, चर्चांन उधाण