आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्राचे मन जिंकणारी लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड हिच्या लहान भावाने खूप मोठे सरप्राईज त्याच्या वडिलांना दिले आहे. कौस्तुभ गायकवाड हा कार्तिकीचा लहान भाऊ सुद्धा प्रसिद्ध गायक आहे. त्याने आपल्या वडिलांना जे गिफ्ट दिलं ते पाहून वडिलांना आश्चर्याचा धक्काच बसला. (Kartiki Gaikwad’s 22-year-old brother’s special gift to his father; New Mercedes)
कार्तिकी गायकवाडचा लहान भाऊ कौस्तुभ गायकवाडने आपल्या वडिलांना एक ‘मर्सिडीज’ गाडी भेट दिली आहे. कार्तिकी गायकवाडने सोशल मीडियावर याबाबत व्हिडिओ शेअर करून आपल्या भावाचे गोड कौतुक केले.
गायकवाड आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, ‘माझ्या कौस्तुभ दादाने वयाच्या २२ व्या वर्षी माझ्या बाबांना मर्सिडीज गिफ्ट केली. त्याला खूप शुभेच्छा.’ अशा शब्दात आपल्या भावाचे गोड कौतुक कार्तिकी गायकवाडने केले आहे.
तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा लहान भाऊ कौस्तुभ एका डॉक्युमेंटवर सही करताना दिसतो आहे. त्यानंतर त्यांचे वडील आनंदजी गायकवाड शोरूममध्ये येतात आणि मुलाने दिलेले हे गिफ्ट पाहून भारावून जातात, असे दिसते.
आपल्या मुलांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली याचा आनंद गायकवाड यांना अभिमान आहे. आपल्या स्व:कर्तृत्वाने मिळवलेल्या पैशांतून वडिलांना अनोखे गिफ्ट देण्याचा आनंद काही औरच असल्याचे भाव कौस्तुभच्या चेहऱ्यावर याप्रसंगी झळकले.
आळंद- पंढरपूर वारकरी संप्रदायात आनंदजी गायकवाड अनेक वर्षांपासून संगीतसेवा करत आहेत. आनंदजी यांची वेगळी ओळख संगीत क्षेत्रात आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक अभंगांना सुरेश वाडकरांसहित अनेक दिग्गजांनी गायले आहे. कार्तिकी आणि कौस्तुभ या त्यांच्या मुलांनी पण संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला.
महत्वाच्या बातम्या-
पक्षाला सोडून जाणारे बांगर, कदम रडले; पण या निष्ठावान शिवसैनिकाने सर्वांनाच रडवले, पहा व्हिडिओ
याला निष्ठा ऐसे नाव! मुस्लिम मावळ्याने उद्धव ठाकरेंना स्वतःच्या रक्ताने लिहीलं पत्र; काहीही झालं तरी ठाकरेंसोबतच राहणार
गडकरींनी ९०० कोटी खर्चून केला विजयपूर बायपास अन् फक्त अडीच महीन्यात पडल्या भेगा