Share

‘या’ अभिनेत्याच्या स्टारडममुळे कुटुंबियांनी आणि मित्रांनी त्याला टाकलं वाळीत, नाव वाचून अवाक व्हाल

Kartik Aaryan

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या आगामी ‘भूल भूलैया २’ या चित्रपटामुळे माध्यमात फारच चर्चेत आहे. कार्तिकचा हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यादरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्ताने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कार्तिकने सिनेसृष्टीतील त्याच्या प्रवासाबाबत मोकळेपणाने बोलला आहे.

सिनेसृष्टीशी संबंधित कोणतीही पार्श्वभूमी नसताना कार्तिक स्वतःच्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले. आज कार्तिकजवळ पैसा, प्रसिद्धी, स्टारडम असे सर्वकाही आहे. परंतु असे असतानाही एक गोष्ट त्याच्याजवळ नसल्याची खंत कार्तिकला आहे. स्टारडम मिळाल्यानंतर ही गोष्ट सतत मिस करत असल्याचे कार्तिकने म्हटले आहे.

आजतकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कार्तिकने म्हटले की, ‘जेव्हा मी माझ्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत डिनरला जातो तेव्हा तिथे प्रायव्हसी मिळत नाही. तिथे चाहते सेल्फीसाठी येतात आणि मी त्यांना नाराजही करू शकत नाही. यामुळे माझ्या डिनरचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ सेल्फी देण्यातच जातो. परंतु, चाहते हा विचार करत नाहीत की, मी ज्यांच्यासोबत आलो आहे ते या गोष्टीमुळे नाराज होतात’.

‘मग यामुळे माझे मित्र आणि कुटुंबीय खूप तक्रार करतात. आता तर त्यांना माझ्यासोबत बाहेर जायचंच नसतं. बायकॉट करून टाकलं त्यांनी मला. त्यांना वाटतं की, मी सोबत असलो की, सगळं अटेंशन मीच घेतो. त्यामुळे ते म्हणतात की, तुला सोबत घेऊन जाणं म्हणजे पंगा आहे. त्यामुळे त्यांनी मला त्यांच्यातून पूर्णपणे वगळून टाकलंय’ असे कार्तिक म्हणाला.

कलाकारांना स्टारडम मिळण्यासोबत त्यांच्यावर अनेकवेळा टीकाही होत असते. तर याबाबत बोलताना कार्तिकने म्हटले की, ‘मला टीका करणाऱ्यांची मुळीच पर्वा नाही. करिअरच्या सुरुवातीला मी जसा होतो आताही तसाच आहे. हा पण माझ्यात ज्या त्रुटी आहेत ते दूर करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो’.

कार्तिकने पुढे म्हटले की, ‘बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत मी जास्त विचार करत नाही. मला आकडे महत्त्वाचे नाहीत. परंतु माझी अशी इच्छा असते की, माझा नवीन चित्रपट मागील चित्रपटापेक्षा अधिक चांगली कमाई करावी. आणि तो चित्रपट यशस्वी असावा’.

महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: उर्वशी रौतेलाचा बाथरूममधील व्हिडीओ झाला लीक, सोशल मिडीयावर उडाली खळबळ
VIDEO: शहनाजने जिंकली चाहत्यांची मनं, ब्रम्हकुमारी सिस्टरसोबत दिसली तेव्हा खिळल्या लोकांच्या नजरा
‘तो’ अभिनेता जो ६५ वर्षात अभिनय करून झाला DIG, गिनीज बुकमध्ये आहे नाव, वाचा मजेशीर किस्सा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now