बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया २’ (Bhool Bhulaiyaa २) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा चित्रपट सातत्याने कमाईचे नवनवे रेकॉर्ड तोडत आहेत. पण या चित्रपटाची कमाई पाहता आता कार्तिक आर्यनचे भावही वाढल्याचं दिसतंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकने त्याच्या फीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे.
‘भूल-भुलैया २’ रिलीज झाल्यापासून आता बॉलीवूड हळूहळू रुळावर येत आहे, असे व्यापार तज्ज्ञांना वाटू लागले आहे. अभिनेत्याच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ‘भूल भुलैया २’ आता सुपरहिट किंवा ब्लॉकबस्टर होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे कार्तिक आर्यनने त्याची फी वाढवल्याची बातमी समोर येत आहे. कार्तिक आर्यन सध्या निर्मात्यांची पहिली पसंती आहे. त्याचे चित्रपट कमी बजेटमध्ये चांगला व्यवसाय देतात.
‘भूल भुलैया २’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा कार्तिक आर्यनचा थिएटरमध्ये गेल्या पाच रिलीजपैकी चौथा क्लीन हिट आहे. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिल्यानंतर कार्तिक आर्यनने आपली फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत कार्तिक एका चित्रपटासाठी १५-२० कोटी रुपये घेत होता. बॉलिवूड लाइफनुसार, कार्तिक आर्यन आता एका चित्रपटासाठी ३५-४० कोटी रुपये घेणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कार्तिक आर्यन हा असा अभिनेता आहे ज्याने बॉलिवूडमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली आहे. पंचनामा या चित्रपटातून कार्तिकने अभिनय विश्वात पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख त्याच्या कारकिर्दीत ‘सोनू के टीटू की स्वीटी’ मधून मिळाली आहे. कार्तिकचे करोडो चाहते आपल्याला पाहायला मिळतात.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘भूल भुलैया २’ नंतर कार्तिक आर्यन लवकरच ‘शहजादा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपट अला वैकुंठापुरमुलूचा रिमेक आहे आणि त्यात कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन व्यतिरिक्त मनीषा कोईराला आणि परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. कार्तिक आर्यन शेवटचा ‘धमाका’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला होता.
महत्वाच्या बातम्या-
IPL मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कार्तिकमुळेच RCB चे ट्रॉफीचे स्वप्न भंगले, ‘ती’ एक चूक अन् गमावला सामना
आधी बॉलिवूड अभिनेत्रीला केलं डेट, नंतर तिची केली फसवणूक, स्वत: कार्तिक आर्यनचा खुलासा
कितीही कमावले तरी या कारणांमुळे अक्षय कुमारच्या भुल भुलैयासमोर फिका पडला कार्तिक आर्यन
भुल भुलैयासमोर चित्रपट फ्लॉप झाला तरी कंगनाने केले कार्तिक आर्यनचे अभिनंदन, म्हणाली…