कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा बॉलिवूडमधील आकर्षक आणि प्रतिभावान स्टार्सपैकी एक आहे. तरुणांमध्ये त्याची खूप लोकप्रियता आहे. कार्तिक आर्यनचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. एकेकाळी तो सारा अली खानसोबतच्या (Sara Ali Khan) नात्यामुळे चर्चेत होता. मात्र, या दोघांनी कधीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले नाही. तसेच कधीही उघडपणे बोललो नाही. आता कार्तिक आर्यनने सारासोबतच्या लिंकअपच्या वृत्तावर मौन सोडले आहे.(Karthik Aryan, Sara Ali Khan, Instagram)
सारा अली खान आणि कार्तिक आर्यनने २०२० मध्ये ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या डेटींगच्या अनेक बातम्या आल्या होत्या. मात्र, यादरम्यान दोघांनीही आपलं नातं ना स्वीकारलं ना नाकारलं. रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघेही वेगळे झाले. अगदी इंस्टाग्रामवरही एकमेकांना अनफॉलो केले.
कार्तिक आणि साराच्या रिलेशनशिपची बातमी ही या चित्रपटासाठी प्रमोशनल गिमिक असल्याचंही म्हटलं जात होतं. आता कार्तिकने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान कार्तिक आर्यनने उत्तर दिले की, असे अजिबात नाही. प्रमोशनल नव्हत. मी तुम्हाला कसं समजावू? मला असे म्हणायचे आहे की आपणही माणूस आहोत. सर्व काही प्रमोशनसाठी असते असे नाही. मला या विषयावर एवढेच सांगायचे आहे.
काही काळापूर्वी कार्तिक आणि सारा एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. दोघेही एकत्र बोलताना दिसले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये सारा अली खानने सांगितले होते की, तिला कार्तिक आर्यनवर क्रश आहे. साराच्या या वक्तव्यानंतर #Sartik देखील खूप प्रसिद्ध झाले.
यानंतर कार्तिक आणि साराने २०२० मध्ये रिलीज झालेल्या इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल 2’ चित्रपटात एकत्र काम केले. हा चित्रपट जरी काही खास दाखवू शकला नाही. कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ आज म्हणजेच 20 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. याशिवाय कार्तिक आर्यन ‘कॅप्टन इंडिया’, ‘शेहजादा’मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, सारा अली खानने नुकतेच विकी कौशलसोबत एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
भूल भुलैया: कार्तिक आर्यनसमोर काहीच नाही कियाराची फी, वाचा बाकीच्यांना किती कोटी मिळाले?
त्यामुळे मला कुटुंबियांनी आणि मित्रांनी बायकॉट केलं आहे; कार्तिक आर्यनचा मोठा खुलासा
भुल भूलैया 2 साठी कार्तिक आर्यनने घेतले तब्बल एवढे कोटी, कियारानेही घेतली तगडी रक्कम
बॉलिवूडमध्ये तुझा छळ होतो का? अभिनेता कार्तिक आर्यनने सोडले मौन






