Share

आधी बॉलिवूड अभिनेत्रीला केलं डेट, नंतर तिची केली फसवणूक, स्वत: कार्तिक आर्यनचा खुलासा

कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैया 2‘ च्या यशाचा आनंद घेत आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित, या चित्रपटात कियारा अडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव सारखे कलाकार देखील आहेत. कंगना राणौतच्या ‘धाकड’ला टक्कर देणारा हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला. ‘धाकड’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी कार्तिकच्या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे.(karthik-aryan-had-dated-a-bollywood-actress-now-he-has-made-a-big-revelation)

दरम्यान, कार्तिक(Karthik Aryan) सतत चर्चेत आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनासाठी तो नुकतेच वाराणसीला पोहोचला आहे. या सगळ्याच्या दरम्यान कार्तिकने चित्रपटसृष्टीतील फसवणुकीबद्दल वक्तव्य केले आहे. त्याने यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केल्याची कबुलीही दिली आहे.

जेव्हा कार्तिक आर्यनला विचारण्यात आले की, त्याने कधी बॉलिवूड अभिनेत्रीला डेट केले आहे का? तेव्हा कार्तिकने नाव न घेता होकार दिला. चित्रपटसृष्टीतील फसवणुकीबाबतही तो बोलला. तो म्हणाला की जर को-ॲक्ट्रेससोबत काम करत असेल आणि ते कॉफी घेण्यासाठी बाहेर गेले असतील तर ते डेट करत आहेत असे म्हटले जाते.  यामुळे, तो त्याच्या को-ॲक्ट्रेस आणि मित्रांसोबत फिरणे थांबवत नाही. कार्तिकने याविषयी पुढे सांगितले की, चार लोक बाहेर गेले तर मीडिया फक्त दोघांचेच फोटो पब्लिश करते.

कार्तिक आर्यन ‘लव्ह आज कल 2’ची को-ॲक्ट्रेस सारा अली खानसोबत(Sara Ali Khan) रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच दोघे वेगळे झाले. त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले. या नात्याबद्दल दोघेही उघडपणे बोलले नाहीत. मात्र, काही दिवसांपूर्वी कार्तिक म्हणाला होता, ‘आम्हीही माणूस आहोत. सर्व काही प्रमोशनल नव्हते.’

अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ मध्ये  कार्तिक आर्यन व्यतिरिक्त कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात राजपाल यादव, संजय मिश्रा आणि अमर उपाध्याय यांसारखे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटासोबत कंगना राणौतचा ‘धाकड’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर चांगला चालू शकला नाही.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कार्तिक आर्यनचा पुढील चित्रपट शहजादा आहे, ज्यामध्ये तो त्याची ‘लुका छुपी’ची को-ॲक्ट्रेस क्रिती सेनॉनसोबत(Kriti Senon) दिसणार आहे. या सिनेमात मनीषा कोईराला आणि परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now