Karnatak : बेल्जियमची पोरगी भारतातल्या रिक्षावाल्याचा भोळ्या स्वभावावर झाली फिदा; भारतात येऊन बांधली लग्नगाठ

karnatak camily and anantraju lovestory  | कर्नाटकातील अनंतराजू आणि बेल्जियममधील कॅमिली यांची प्रेम कहाणी सध्या चर्चेत आहे. दोघांनी २५ नोव्हेंबरला हंपीच्या विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. ३० वर्षीय अनंतराजू ऑटो चालवतात आणि टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात. तर कॅमिली ही बेल्जियमची रहिवासी आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो २७ वर्षीय कॅमिलीच्या प्रेमात पडला होता. रिपोर्टनुसार, अनंतराजू यांची कॅमिलीसोबत पहिली भेट २०१९ मध्ये झाली होती. त्यानंतर कॅमिली तिच्या कुटुंबासह हंपीला भेट देण्यासाठी आली होती. त्यावेळी अनंतराजूने तिच्या गाईडचे काम केले होते.

सोबतच त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही अनंतराजूने केली होती. त्यांच्या भारत दौर्‍यादरम्यान, अनंतराजूच्या प्रामाणिकपणाने आणि आदरातिथ्याने हे कुटुंब खूप प्रभावित झाले. त्यानंतर आपल्या देशात परतल्यानंतर, कॅमिल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनंतराजूंच्या संपर्कात राहिली.

दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण कोरोनामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. पण काही महिन्यांनी त्यांनी आपापल्या कुटुंबियांना त्यांच्या ‘लाँग डिस्टन्स लव्ह’बद्दल सांगितले. याला दोन्ही कुटुंबीयांचा कोणताही आक्षेप नव्हता. त्यांनी या जोडप्याला लग्नाला होकार दिला.

अखेर गेल्या शुक्रवारी दोघांचा विवाह झाला. अनंतराजू सांगतो की, कॅमिली २०१९ मध्ये तिच्या आई-वडील आणि भावंडांसोबत हंपीला आली होती. हंपीला ते पहिल्यांदाच आले असल्याने त्यांना इथल्या राहण्याची आणि जेवणाची काळजी वाटत होती. पण त्यांना राहण्यासाठी सर्वोत्तम हॉटेल मिळेल याची सोय मी केली.

पुढे तो म्हणाला की, आम्ही गेल्या वर्षीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण कोरोनामुळे ते लांबले. मात्र, आता आमचे लग्न झाले आहे. हिंदू रितीरिवाजांनुसार आमचे लग्न झाले. लग्नासाठी कॅमिलीचे जवळपास ४० नातेवाईक आणि मित्र हंपी येथे आले होते. तो माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप छान क्षण होता. प्रेमाला सीमा नसते हे माझ्या लग्नाने सिद्ध केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
ajay devgan : दृश्यम २ च्या छप्पर फाड कमाईनंतर अजय पोहचला काशी विश्वनाथ मंदिरात; म्हणाला, हर हर महादेव
झोपून खा नायतर लोळून! फक्त शेतीचा नाद पाहिजे; पठ्या वर्षाला कमावतो तब्बल दिड कोटी नफा; जाणून घ्या कसं?
गायीचं दूध व शेण विकून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला कमावतो तब्बल दीड कोटी; वाचा सांगोल्याच्या पठ्याची सक्सेस स्टोरी