बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची (Karisma Kapoor) जादू आजही चाहत्यांला भुरळ घालते. आता करिश्मा कपूरने चाहत्यांना जणू तीस वर्षे मागे नेले आहे. करिश्माने क्रेड (Karisma Kapoor Cred Ad)च्या जाहिरातीत काम केले आहे. या नवीन जाहिरातीत करिश्मा कपूरने 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध निरमा जाहिरात (Nirma Ad) पुन्हा तयार केली आहे.( Karisma Kapoor Recreates Famous Nirma Ad)
क्रेडने करिश्मा कपूरसोबत निरमा सुपर डिटर्जंटसाठी 90 च्या दशकातील प्रसिद्ध जाहिरात पुन्हा तयार केली आहे. निरमाच्या मूळ जाहिरातीत रामायणातील सीता दीपिका चिखलिया दिसली होती. तिला पांढरी साडी नेसून दुकानात जाताना दाखवण्यात आले होते. आता तशाच प्रकारे करिश्माही पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेल्या क्रेडी बाउंटीबद्दल बोलत आहे.
करिश्मा कपूरने तिची ही नवीन जाहिरात इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिची ही स्टाइल पाहून यूजर्सना 90 च्या दशकाची आठवण झाली. व्हिडिओबद्दल सांगायचे झाले तर, सुरुवातीला करिश्मा कपूर कारमधून खाली उतरते आणि एका दुकानात जाते. दुकानदार तिला त्यांचा माल देतो. पण करिश्मा दुकानदाराच्या मागे असलेल्या चार्जरची मागणी करते. दुकानदार तिला विचारतो की, तू नेहमी साधा चार्जर घेतेस. तेव्हा ती म्हणाली घेत होते, पण आता क्रेडिट बाउन्टीमध्ये आयफोन मिळतो तेव्हा साधा चार्जर का घ्यायचा? यानंतर दुकानदार म्हणतो, मानल पाहिजे तुमच्या नशीबला आणि क्रेडिट बाऊंटीला.
ही क्रेड जाहिरात निरमाच्या 1989 च्या जाहिरातीला थ्रोबॅक आहे. अगदी निरमाच्या जाहिरातीप्रमाणे ती फ्रेम बाय फ्रेम आणि लाईन बाय लाईन बनवण्यात आली आहे. करिश्मा कपूरच्या या जाहिरातीवर चाहते सतत कमेंट करत आहेत. गायिका रेखा भारद्वाजने ‘मला त्या काळात परत नेले’ अशी प्रतिक्रिया दिली.
त्याचवेळी एका चाहत्याने लिहिले की, ‘या जाहिरातीने पुन्हा एकदा 90 च्या दशकातील वातावरण तयार केले, त्यावेळच्या जाहिराती खरोखरच खूप चांगल्या होत्या.’ अनेक यूजर्स करिश्मा कपूरच्या लूकची प्रशंसा करत आहेत आणि तिला क्यूट आणि सुंदर देखील म्हणत आहेत. क्रेडबद्दल बोलायचे झाले तर ते आपल्या अनोख्या जाहिरातींसाठी ओळखले जाते. याआधीही क्रेडने अनेक जाहिराती केल्या आहेत, ज्या लोकांना खूप आवडल्या आहेत. क्रेडने जॅकी श्रॉफ, बप्पी लाहिरी, नीरज चोप्रा आणि कपिल देव यांना आपल्या जाहिरातीचा भाग बनवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
स्टाईलिश लूक, जबरदस्त ऍब्स, शाहरुख खानने शेअर केला ‘पठाण’चा पहिला लूक; कॅप्शनने लोकांना लावले वेड
नाद केला भावा तू! परदेशातील नोकरीला लाथ मारून मायदेशी फुलवली शेती, आज लाखोंची उलाढाल
बॉलिवूडच्या फेमस जोडीत आला दुरावा; लग्नाची बोलणी सुरू असतानाच श्रद्धा कपूरचा झाला ब्रेकअप
ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय