Share

करीना कपूरच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था, फोटो पाहून चाहत्यांना देखील बसला धक्का

नुकताच संपूर्ण देशात होळीचा सण साजरा झाला. अनेकांनी रंगांची उधळण करून हा सण साजरा केला. तर काहींनी अगदी साध्या पद्धतीने हा सण साजरा केला. मात्र बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूरने मालदीवमध्ये होळी साजरी केली. करीना बहिण करिश्मा कपूर आणि मुलांसोबत मालदीवला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली होती.

या सुट्टीचा दोघी बहिणींनी खूप आनंद घेतला आणि मस्ती देखील केली. त्याचबरोबर यांनी समुद्राच्या व्ह्युचा ही आनंद घेतला. याच दरम्यान, करिश्मा कपूरने काही फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे सध्या करीना चर्चेचा विषय बनली आहे. यामध्ये करिनाचा असा फोटो समोर आला आहे, जो पाहून सर्वांनाच धक्का बसेल.

या फोटोमध्ये करिश्मा आणि करीना समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये करिनाचा चेहरा इतका लाल दिसत आहे. ज्यावरून स्पष्ट होते की, करीना उन्हामुळे चांगलीच टॅन्ड झाली आहे. या फोटोमध्ये तिचा चेहरा सूर्यप्रकाशामुळे इतका खराब झाला आहे की, करीनाला एका नजरेत ओळखणे कठीण झाले आहे. या फोटोमध्ये करीनाने निळ्या रंगाचा वन पीस घातला आहे. तर करिश्माने पांढरा आणि लाल रंगाचा कॉम्बिनेशन ड्रेस घातला आहे.

तसेच मालदीवचा हा फोटो करिश्मा कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करिश्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एकमेकांचे आभारी आणि मधल्या प्रत्येक गोष्टीसाठी.’ यासोबतच करिश्माने हार्ट इमोजीही पोस्ट केले आहे.

या अगोदर ही करीनाने एक ग्रुप फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये करीना कपूर खान, करिश्मा कपूर आणि मायरा कपूर बिकिनी परिधान केलेली दिसत आहेत. या तिघीही कॅमेऱ्याकडे पाठ करून बसलेल्या होत्या. तसेच करीनाच्या चाहत्यांना तिचा हा फोटो खूप आवडला आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत तिचे लहान मुलेही दिसत आहेत.

त्याचबरोबर करीना आणि करिश्माची मुले अनेकदा एकत्र वेळ घालवतात. मात्र चारही मुले पहिल्यांदाच एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या फोटोत करिश्माची दोन्ही मुले मायरा कपूर आणि कियान कपूर दिसत आहेत. तर करिनाची दोन्ही मुले तैमूर आणि जेह देखील दिसत आहेत. तसेच हे सर्व वाळूवर पोज देताना दिसत आहेत.

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now