Share

Kareena Kapoor: करीना कपूरचा बॉलिवूडच्या पार्टीबाबत मोठा खुलासा; म्हणाली, पार्टीमध्ये रात्री दोन वाजता…

Kareena kapoor on bollywood party | बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असते. करीना आणि अभिनेता आमिर खान हे नुकतेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ मध्ये आले होते. यावेळी करीना आणि आमिरने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड पार्टीत रात्री २ वाजता काय सुरू होते, याबाबतही करीनाने सांगितले आहे. करणने त्याच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केले होते. त्यात आमिर खान सुद्धा होता. करणच्या पार्टीला आमिरनेही हजेरी लावली होती पण त्याला ही पार्टी आवडली नाही.

आमिरला पार्टी आवडली नाही, यावरही करीना बोलली आहे. करीना म्हणाली की, आमिर खूप बोरिंग आहे. त्यामुळे करणने आमिरला पार्टी पॉपर म्हटले होते. हे ऐकून आमिर म्हणाला, पार्टीमध्ये खूप मोठ्या आवाजात गाणी लावली जातात, जे मला आवडत नाही.

आमिर पुढे म्हणाला, मी रात्री १० वाजता पार्टीत आलो. त्या वेळी संगीत खूप जोरात होते आणि कोणीही नाचत नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही जोरजोरात बोलावे लागत होते. पण मला ओरडून बोललेलं आवडत नाही. त्यामुळे मला पार्टी कंटाळवणी वाटत होती.

आमिर खानच्या उत्तरावर करीना कपूर म्हणाली की, आमिर, सहसा पार्टीत येणारे लोक शॉट घेतात. साऊंड सिस्टिमसमोर येऊन हिंदी गाण्यांवर डान्स करतात. एका पार्टीत २०० लोक असतील तर आमिर तिथून पळ काढताना दिसतो, असेही करीनाने म्हटले आहे.

करिनाने या सेलिब्रिटी पार्टीत काय घडते याचा खुलासा केला. तिने सांगितले की रात्री २ वाजता पार्टीत येणारे लोक बेजाबदारपणे नाचू लागतात. बी-टाऊनच्या सेलिब्रेशनचे चित्र सर्वांसमोर ठेवत करीना म्हणाली की, पार्टीमध्ये आलं पाहिजे, मजा मस्ती केली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-
Mahavitaran: महावितरणची भन्नाट स्कीम, घरगुती वीजबिलावर वाचणार ५५० रुपये, जाणून घ्या कसं…
Eknath Shinde: ठाकरे कुटुंबियांवर टिका करणाऱ्या बंडखोर आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापले; म्हणाले…
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप- शिंदे गटाचा वरचष्मा; ठाकरे गटाला मोठा धक्का

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now